05 December 2020

News Flash

…तरच मी सलमानसोबत काम करेन- दीपिका पदुकोण

केवळ शोभेची बाहुली म्हणून एखादा फुटकळ रोल मी करणार नाही.

अभिनेता सलमान खान आणि दीपिका पदुकोण या जोडीने रूपेरी पडद्यावर एकत्र काम करण्याचा योग आत्तापर्यंत एकदाही जुळून आलेला नाही. यापूर्वी ‘प्रेम रतन धन पायो’ आणि ‘सुलतान’ चित्रपटासाठी दीपिकाला विचारण्यात आले होते. तेव्हा दीपिकाने सलमानसोबत काम करण्यास सरळपणे नकार दिला होता. मात्र, लवकरच हे दोघे दिग्दर्शक कबीर खानच्या आगामी चित्रपटात एकत्रितपणे काम करणार असल्याची चर्चा आहे.  कबीर खानने तुर्तास तरी हा केवळ प्रसारमाध्यमांचा तर्क असल्याचा दावा केला आहे. मात्र, आमच्या अधिकृत घोषणेसाठी थांबा, असे सूचक विधानही त्याने केले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार सुरूवातीला या भूमिकेसाठी कतरिना कैफदेखील स्पर्धेत होती. मात्र, शेवटच्या क्षणी चित्रपटात दीपिकाची वर्णी लागली. परंतु, या चित्रपटात काम करण्यासाठी दीपिकाने निर्माते आणि दिग्दर्शकांसमोर एक अट ठेवल्याची चर्चा आहे. दीपिकाची आत्तापर्यंतची कारकीर्द पाहता बहुतांश चित्रपट तिने स्वत:च्या जोरावर यशस्वी करून दाखवले आहेत. याउलट सलमान खानचे चित्रपट हे नेहमीच नायकप्रधान असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे सलमान खानसोबत काम करतानाही नायिकेची भूमिका तोलामोलाची असावी, अशी अट तिने घातली आहे. केवळ शोभेची बाहुली म्हणून एखादा फुटकळ रोल मी करणार नाही, असे दीपिकाने कबीरला स्पष्टपणे सांगितले आहे. त्यामुळे आता कबीर यामधून कसा मार्ग काढणार आणि प्रेक्षकांना वेगळ्या धाटणीचा चित्रपट पाहायला मिळणार का, याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 20, 2016 11:58 am

Web Title: deepika padukone agrees to romance salman khan on few conditions
Next Stories
1 प्रत्युषाच्या आत्महत्येचा आणि गर्भपाताचा काहीही संबंध नाही
2 मोहम्मद अझरुद्दीनसारखे दिसण्यासाठी इम्रान हाश्मीने केल्या या गोष्टी
3 सलमानच्या ‘सुलतान’मधील पिळदार शरीरयष्टीसाठी फोटोशॉपचा वापर?
Just Now!
X