News Flash

दीपिकाच्या बॅगची किंमत जाणून तुम्हीही म्हणाल, अरे बापरे!

सध्या सोशल मीडियावर दीपिकाच्या बॅगची जोरदार चर्चा सुरु आहे

(photo courtesy- instant bollywood)

बॉलिवूड सेलिब्रीटींसाठी त्यांचे चित्रपट जितके महत्वाचे असतात तितकेच त्यांचे स्टारडम टिकवून ठेवणे त्यांच्यासाठी महत्त्वाचे असते. मग ती त्यांची स्टाईल असो किंवा ड्रेसिंग. खास करुन बॉलिवूड अभिनेत्रींचा याकडे कल असतो. अभिनेत्री बऱ्याच वेळा करोडो रुपये खर्च करुन त्यांचे आउटफिट्स आणि अॅक्सेसरीज खरेदी करताना दिसतात. सतत हटके आणि ग्लमरस अंदाज दिसण्याकडे त्यांचा कल असतो. मग तो एअरपोर्ट लूक असो किंवा एखाद्या कार्यक्रमात लावलेली हजेरी असो.

अनेकदा बॉलिवूड अभिनेत्रींचे एअरपोर्टवरील लूक आणि त्या लूकवर घेतलेल्या बॅगा चर्चेत असतात. नुकताच अभिनेत्री दीपिका पादुकोणला बंगळुरु एअरपोर्टवर स्पॉट करण्यात आले. दरम्यान तिने साधारण राखाडी रंगाचा स्वेट टी-शर्ट परिधान केला असून त्याच रंगाीची ट्राऊझर परिधान केली आहे. यासोबतच तिने ब्लॅक सनग्लासेस आणि ब्राउन शूज कॅरी केले होते. या लूकमध्ये दीपिका अत्यंत ग्लॅमरस अंदाजात दिसत होती. मात्र तिच्या ग्लॅमरस अंदाजापेक्षा तिच्या बॅगने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या बॅगची किंमत ऐकून तुम्ही ही थक्क व्हाल.

 

View this post on Instagram

 

Every time Deepika Padukone arrives at the airport there is a fashion tip to take note of – Agree? . . #deepikapadukone

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood) on

एअरपोर्ट लूकवर दीपिकाने घेतलेली ही बॅग louis vuitton (Louis Vuitton carryall bag coated with canvas and VVN) या ब्रँडची ट्रॅव्हलर बॅग आहे. या बॅगची किंमत तब्बल १ लाख २२ हजार ८६० रुपये असल्याचे म्हटले जात आहे. सध्या सोशल मीडियावर दीपिकाच्या या बॅगचीच चर्चा आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 8, 2019 1:36 pm

Web Title: deepika padukone airport look bag price avb 95
Next Stories
1 शिवाजी महाराजांचा अवमान केल्याप्रकरणी ‘सोनी वाहिनी’ने मागितली माफी; ट्विट करुन म्हणाले…
2 #balareview : मजा आ गया गुरु!
3 रितेश देशमुखने अक्षयकुमारची नक्कल केलेला व्हिडीओ पाहिलात का??
Just Now!
X