28 February 2021

News Flash

दीपिकाच्या दारात तीन तास गुलाब घेऊन उभा होता नील नितीन मुकेश, आणि…..

'लफंगे परिंदे' या चित्रपटात दीपिका आणि नीलने स्क्रीन शेअर केली होती

सौंदर्य आणि उत्तम अभिनयशैलीच्या जोरावर अभिनेत्री दीपिका पदुकोणने कलाविश्वात व प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे. मनमोहक हास्यामुळे अनेकांना घायाळ करणारी दीपिका आज अनेकांचं क्रश असल्याचं पाहायला मिळतं. विशेष म्हणजे केवळ चाहतेच नाही तर कलाविश्वातही तिचे असंख्य चाहते असल्याचं पाहायला मिळतं. यातलच एक नाव म्हणजे अभिनेता नील नितीन मुकेश. खास दीपिकाला भेटण्यासाठी नील तिच्या घराबाहेर तीन तास उभा होता असं म्हटलं जातं.

दीपिका आणि नील नितीन मुकेश या दोघांनी लफंगे परिंदे या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. या चित्रपटानंतर या दोघांच्या अफेअरच्या चर्चा रंगू लागल्या होत्या. इतकंच नाही तर २०१० मध्ये नीलने दीपिकासाठी केलेल्या ट्विटमुळे त्यांच्या नात्याविषयी अनेक चर्चांना उधाण आलं होतं. काल मी तुझ्या घराबाहेर हातात गुलाबाची फुलं घेऊन तब्बल तीन तास उभा होतो. नंतर मला समजलं की तू तुझ्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी बाहेर गेली आहेस, असं ट्विट नीलने केलं. त्यांच्या या ट्विटनंतर अनेकांच्या नजरा या दोघांकडे वळल्या होत्या.

एका मुलाखतीत नील नितीन मुकेशने याविषयी व्यक्त झाला होता. “मी आणि दीपिका चांगले मित्र आहोत. ती मला माझ्या कुटुंबातील सदस्यांप्रमाणे आहे. अगदी सकाळी ४ वाजता सुद्धा मी तिला फोन करु शकतो. तिच्या चेहऱ्यावरील हास्य पाहिल्यावर अनेकांच्या चेहऱ्यावर अपोआप हसू उमटतं. ती फार गोड आणि चांगली व्यक्ती आहे”, असं तो म्हणाला.

दरम्यान, २०१० मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या ‘लफंगे परिंदे’ या चित्रपटात दीपिका आणि नीलने स्क्रीन शेअर केली होती. या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रदिप सरकार यांनी केलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 15, 2020 2:38 pm

Web Title: deepika padukone and neil nitin mukesh love story ssj 93
Next Stories
1 सिनेसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार होणार रद्द?; ऑस्कर सदस्याचे धक्कादायक वक्तव्य
2 सुशांतने आत्महत्या करण्यापूर्वी नेमकं काय घडलं?
3 सुशांतच्या आत्महत्येमुळे सनी लिओनीला बसला जबरदस्त धक्का; म्हणाली…
Just Now!
X