17 January 2021

News Flash

इन्स्टाग्रामवर ‘या’ दोन व्यक्तींना सर्वाधिक फॉलो करतात भारतीय

इन्स्टाग्रामवर सर्वाधिक पसंती ही अभिनेत्यांना नाही तर अभिनेत्रींना मिळताना दिसत आहे.

इन्स्टाग्रामवर सर्वाधिक फॉलो केल्या जाणाऱ्या व्यक्तींच्या यादीत देसी गर्ल प्रियांका चोप्रा आणि दीपिका पदुकोण अव्वल आहे.

इन्स्टाग्राम हे फोटो शेअरिंग अॅप सर्वाधिक लोकप्रिय अॅप ठरलं आहे. भारतातील अनेक सेलिब्रिटी इन्स्टाग्रामवर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. काहींचे फॉलोअर्स हे कोट्यवधींच्या घरात आहे. ट्विटरवर सर्वाधिक फॉलो केल्या जाणाऱ्या सेलिब्रिटींच्या यादीत अमिताभ बच्चन, शाहरुख खान, अक्षय कुमार, सलमान खान हे सेलिब्रिटी आघाडीवर आहे. मात्र इन्स्टाग्रामवर सर्वाधिक पसंती ही अभिनेत्यांना नाही तर अभिनेत्रींना मिळताना दिसत आहे.

इन्स्टाग्रामवर सर्वाधिक फॉलो केल्या जाणाऱ्या व्यक्तींच्या यादीत देसी गर्ल प्रियांका चोप्रा आणि दीपिका पदुकोण अव्वल आहे. भारतीय इन्स्टाग्रामवर सर्वाधिक या दोन अभिनेत्रींना फॉलो करतात. प्रियांकाचे इन्स्टाग्रामवर अडीच कोटी फॉलोअर्स आहेत. तर नुकताच या यादीत दीपिका पदुकोणचाही समावेश आहे. दीपिकानंही अडीच कोटींचा टप्पा पार केला आहे. दीपिकानं इन्टाग्राम स्टोरी शेअर करत चाहत्यांना खुशखबर दिली आहे.

मात्र ट्विटरच्या यादीत प्रियांका पहिल्या पाचमध्येही नाही. प्रियांकाचे ट्विटवर फॉलोअर्स हे दीपिकाच्या तुलनेत कमी आहे. जगभरात सर्वाधिक इन्स्टा फॉलोअर्स सर्वाधिक असणाऱ्या यादीतही हॉलिवूड अभिनेत्री आणि पॉप सिंगरचा समावेश आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 6, 2018 5:36 pm

Web Title: deepika padukone and priyanaka chopra become most followed celebrities on instagram
Next Stories
1 ..अन् तिने घेतला सनीची भूमिका साकारण्याचा धाडसी निर्णय
2 Sanju Box Office Collection : अवघ्या सात दिवसांत पार केला २०० कोटींचा आकडा
3 ‘संजू’ने मोडला ‘थ्री इडियट्स’चा रेकॉर्ड
Just Now!
X