News Flash

Video : नैना-बनी पुन्हा एकत्र; वॅनिटी व्हॅनमध्ये केला डान्स

काही चित्रपटांच्या आठवणी प्रेक्षकांच्या मनात कायम राहतात. असाच एक चित्रपट म्हणजे 'ये जवानी है दिवानी'.

रणबीर कपूर, दीपिका पदुकोण

काही चित्रपटांच्या आठवणी प्रेक्षकांच्या मनात कायम राहतात. असाच एक चित्रपट म्हणजे ‘ये जवानी है दिवानी’. या चित्रपटातील नैना आणि बनीच्या भूमिकेतील दीपिका पदुकोण, रणबीर कपूरने प्रेक्षकांची मनं जिंकली. रणबीर-दीपिकाच्या ब्रेकअपनंतर हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यामुळे चित्रपटाची क्रेझ फार होती. यातील गाणी, संवाद, रणबीर-दीपिकाची केमिस्ट्री, कथा एकंदर सगळ्याच गोष्टींनी प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली. रणबीर-दीपिका आता ऑफस्क्रीनसुद्धा चांगले मित्र आहेत. याचीच एक झलक दीपिकाच्या इन्स्टास्टोरीमधून झळकली.

दीपिकाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक व्हिडिओ अपलोड केला आहे. वॅनिटी व्हॅनिटीमध्ये रणबीरसोबत डान्स करतानाचा हा व्हिडिओ आहे. ‘ये जवानी है दिवानी’ चित्रपटातील गाजलेल्या ‘बलम पिचकारी’ या गाण्यावर हे दोघे डान्स करत आहे. कुठल्यातरी शूटिंगच्या फावल्या वेळेत त्यांनी डान्सचा आनंद लुटल्याचं दिसत आहे.

ब्रेकअपनंतरही रणबीर-दीपिकाने मैत्री कायम ठेवली. रणवीर सिंगशी लग्न केल्यानंतरही दीपिकाने रणबीरसोबत काम केलं. या दोघांचं एकत्र काम करण्यावर माझा काहीच आक्षेप नाही, असं रणवीरनेही स्पष्ट केलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 31, 2019 5:28 pm

Web Title: deepika padukone and ranbir kapoor dance on yeh jawani hai deewani song in latest video
Next Stories
1 किर्ती कुल्हारी व ‘तुंबाड’ फेम सोहम शाह करणार एकत्र काम
2 भारत VS टीम इंडिया, प्रेक्षक कोणाला निवडणार?
3 कतरिना सांगतेय तणावमुक्त जगण्याचा मार्ग
Just Now!
X