01 March 2021

News Flash

जाणून घ्या रणवीर दीपिकाची लव्ह स्टोरी

दीपिका आणि रणवीरच्या ऑनस्क्रिन केमिस्ट्रीपेक्षा त्यांची ऑफस्क्रिन केमिस्ट्री सर्वात जास्त गाजली होती

सहा वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर अखेर गेल्या वर्षी लग्न बंधनात अडकलेले बॉलिवूडमधील सर्वात जास्त चर्चेतील कपल म्हणजे अभिनेत्री दीपिका पदूकोण आणि रणवीर सिंग. बॉलिवूडचे हे बाजीवर-मस्तानी गेल्या वर्षी १४ नोव्हेंबर २०१८ मध्ये बोहल्यावर चढले. दोघांनी संजय लीला भन्साली यांच्या ‘गोलियों की रासलीला राम-लीला’ या चित्रपटात पहिल्यांदा एकत्र काम केले होते. या चित्रपटादरम्यान दोघांची लव्ह स्टोरी सुरु झाल्याचे म्हटले जाते. चला जाणून घेऊया ‘दीप-वीर’ची लव्ह स्टोरी…

दीपिका आणि रणवीरच्या ऑनस्क्रिन केमिस्ट्रीपेक्षा त्यांची ऑफस्क्रिन केमिस्ट्री सर्वात जास्त गाजली होती. दोघांना पहिल्यांदा एका अवॉर्ड फंक्शनमध्ये एकत्र पाहिले गेले होते. मात्र त्यांना रुपेरी पडद्यावर पहिल्यांदा एकत्र आणले ते म्हणजे बॉलिवूड दिग्दर्शक संजय लीला भन्साली यांनी. २०१३ मध्ये प्रदर्शित झालेल्या भन्सालींच्या ‘गोलियों की रासलीला राम-लीला’ या चित्रपटात पहिल्यांदा दीपिका आणि रणवीर यांनी स्क्रिन शेअर केली होती आणि याच चित्रपटादरम्यान दोघांनामध्ये जवळीक वाढायला सुरुवात झाली. या चित्रपटात अनेक रोमॅन्टीक सीन आहेत. असे म्हटले जाते की चित्रपटातील एका सीनमध्ये दोघेही इतके मग्न होते की दिग्दर्शकाने कट म्हटल्यानंतरही दोघे थांबले नव्हते.

आणखी वाचा : कोणी तरी थांबवा याला! लग्नाच्या वाढदिवसासाठी रणवीरची जोरदार तयारी

‘दीपिका आणि रणवीरमध्ये मैत्रीपेक्षा जास्त काहीतरी सुरु असल्याचे आम्हा सर्वांनाच वाटयचे. ही गोष्ट चित्रपटातील “अंग लगा दे रे” गाण्याच्या चित्रीकरणादरम्यान सिद्ध झाली. त्यावेळी हे दोघे प्रेमात असल्याचे कन्फर्म झाले. या गाण्यातील एक किसिंग सीन खूपच पॅशनेट होता. मी तो सीन अजिबात विसरू शकत नाही. रणवीर आणि दीपिकाचा हा किसिंग सीन शूट होत होता. दिग्दर्शकांनी कट म्हटले पण हे दोघे एकमेकांना किस करत राहिले. त्यावेळी सर्वांना समजले हे दोघे प्रेमात आहेत’ असा खुलासा गोलियों की रासलीला राम-लीला चित्रपटाच्या सेटवरील एका क्रू मेंबरने केला.

आणखी वाचा : ‘चला हवा येऊ द्या’च्या सेटवर पाहिलं आणि शनाया पडली प्रेमात

दीपिका आणि रणवीरला एकत्र आणण्यास संजय लीला भन्साली यांची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे म्हटले जाते. कारण या कपलने भन्सालींच्या एक नाही तर तीन चित्रपटात एकत्र काम केले. २०१३ मध्ये ‘गोलियों की रासलीला राम-लीला, दुसरा २०१५ मध्ये प्रदर्शित झालेला ‘बाजीराव- मस्तानी’ आणि तिसरा ‘पद्मावत’ या चित्रपटात काम केले. या व्यतिरिक्त त्या दोघांनी ‘फाइनडिंग फॅनी’ चित्रपटात एकत्र काम केले होते. आता लवकरच ते पुन्हा एकदा ’83’ चित्रपटात एकत्र झळकणार आहे. त्यांची ऑनस्क्रिन केमिस्ट्री पुन्हा पाहण्यासाठी चाहते फार उत्सुक आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 14, 2019 11:34 am

Web Title: deepika padukone and ranveer singh love story avb 95
Next Stories
1 Photo : हॉट फोटोशूट करणाऱ्या ‘या’ स्टार कीडला ओळखलंत का?
2 जबरा फॅन! चाहतीमुळे शाहरुखला मिळाली चंद्रावर जमीन
3 हॉलिवूड चित्रपटातील ‘तो’ सीन ब्लर केल्यामुळे फरहान अख्तरची आगपाखड
Just Now!
X