News Flash

या दिवशी होणार दीप-वीरची जंगी रिसेप्शन पार्टी

जे लग्नासाठी इटलीत उपस्थिती राहणार नाही त्यांच्यासाठी मुंबईत जंगी पार्टीचं आयोजन करण्यात आलं आहे.

बॉलिवूडमधली सर्वाधिक लोकप्रिय जोडी दीपिका आणि रणवीर हे दोघंही या आठवड्यात विवाहबंधनात अडकणार आहे. परीकथेला शोभेल असा हा विवाहसोहळा १४ आणि १५ नोव्हेंबरला इटलीत पार पडणार आहे. इटलीतील लेक किमो परिसरात व्हिला दी बाल्बिआनेलो येथे कोंकणी आणि सिंधी पद्धतीनं विवाहसोहळा होणार आहे. मात्र या सोहळ्यासाठी कुटुंबातील केवळ मोजक्याच लोकांना आमंत्रित करण्यात आलं आहे.

पण, जे लग्नासाठी इटलीत उपस्थिती राहणार नाही त्यांच्यासाठी मुंबईत जंगी पार्टीचं आयोजन करण्यात आलं आहे. २८ नोव्हेंबरला मुंबईतील ग्रँट हयात या आलिशान ठिकाणी दीप-वीरची रिसेप्शन पार्टी असणार आहे. या पार्टीसाठी संपूर्ण बॉलिवूडला आमंत्रण देण्यात आलं आहे. त्यामुळे या रिसेप्शन पार्टीत बॉलिवूडमधल्या बड्या कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळणार हे नक्की.

इटलीत विवाहसोहळा पार पडल्यानंतर दीपिका वीर लगेचच मुंबईत परतणार आहे. इटलीत मोजक्यात जणांना लग्नाचं आमंत्रण देण्यात आलं आहे, यात बॉलिवूडमधल्या केवळ तीन जणांनाच आमंत्रण असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे दीप- वीरच्या लग्नात शाहरुख खान, फराह खान आणि संजय लीला भन्साळीच उपस्थित राहणार असल्याचं समजत आहे. शाहरुखनसोबत दीपिकानं पहिल्यांदा बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. तर फराह खाननं तिला पहिला बॉलिवूड ब्रेक दिला होता, म्हणूनच या दोघांना खास आमंत्रण पादुकोन परिवारातर्फे देण्यात आलं आहे. तर संजय लीला भंन्साळीमुळे हे दोघंही एकत्र आले, त्यामुळे ते देखील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 12, 2018 5:36 pm

Web Title: deepika padukone and ranveer singh wedding reception in mumbai
Next Stories
1 Video : ‘नशीबवान’ भाऊ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
2 Kedarnath Trailer : ये पूरे केदारनाथ की बात है
3 Video : करिनाच्या ‘या’ भावाशी सारा खानला करायचं लग्न ?
Just Now!
X