05 March 2021

News Flash

ऋषिकेशमध्ये साधुसंतांसोबत दीपिकाने केली गंगा आरती

सिनेमाच्या प्रदर्शनाआधी ती सिद्धीविनायकाचे दर्शन घेते

अभिनेत्री दीपिका पदुकोण

जगभरात नावाजली गेलेली अभिनेत्री अशी दीपिका पदुकोणची ओळख आहे. ‘ट्रिपल एक्स’ या हॉलिवूडपटामुळे तिच्या चेहऱ्याला जागतिक ओळख मिळाली. या सिनेमात ती विन डिझेलसोबत दिसली होती. करिअरच्या निमित्ताने दीपिका सातासमुद्रापार जरी गेली तरी ती आपले मूळ विसरली नाही याचा प्रत्यय नुकताच आला. दीपिका सोमवारी ऋषिकेशला देवदर्शनाला गेली असता तिथे तिने भक्तीभावाने आरती केली. ‘चेन्नई एक्स्प्रेस’मधील या अभिनेत्रीने सामान्य कपड्यांनाच प्राधान्य दिलं. आरती करताना तिच्या चेहऱ्यावरचे भक्तीभाव स्पष्ट दिसत होते. अनेक भारतीयांचे ऋषिकेशला जाऊन गंगा नदीचं दर्शन घेणं आणि आरती करणं हे स्वप्न असतं. दीपिकाने आपल्या कामाच्या वेळापत्रकातून वेळ काढून आईसोबत देवदर्शन केले.

दीपिका फार धार्मिक आहे हे तर सगळेच जाणतात. तिच्या प्रत्येक सिनेमाच्या प्रदर्शनाआधी ती सिद्धीविनायकाचे दर्शन घेते. या वर्षाची सुरुवात तिने ‘ट्रिपल एक्सः द रिटर्न ऑफ झेंडर केज’ या सिनेमाच्या प्रदर्शनाने केली. जरी दीपिका ऑस्करच्या रेड कार्पेटवर दिसली नसली तरी ऑस्कर पुरस्कारांच्या आफ्टर पार्टीमध्ये तिच्यावरून अनेकांच्या नजरा हटत नव्हत्या. बॉलिवूडमध्ये सर्वात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री म्हणू दीपिकाकडेच पाहिलं जातं. २०१६ च्या ‘फोर्ब्स’ यादीत भारतातील सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या १० अभिनेत्रींमध्ये तिच्या नावाचा सहभाग होता.

काही दिवसांपूर्वी दीपिकासोबत चिठ्यांचा खेळ (फिशिंग फॉर आनसर्स) खेळण्यात आला होता. राजीव मसंदने त्यांच्या यूट्यूब चॅनलवरून हा व्हिडिओ शेअर केला होता. यात जगाचा निरोप घेण्यापूर्वी अशी कोणती गोष्ट आहे जी हमखास करायची आहे या प्रश्नाचं उत्तर देताना तिने मरण्यापुर्वी खूप सारी मुलं हवी आहेत असं उत्तर दिलं. तसंच तिच्या पहिल्या मानधनाचा आकडा ३५०० रुपये होता असेही तिने या प्रश्नोत्तराच्या खेळात मान्य केलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 4, 2017 11:25 am

Web Title: deepika padukone attends aarti at rishikesh and the pics are really heartwarming
Next Stories
1 BLOG : …अॅण्ड अॅवार्ड गोज् टू दादा!
2 … म्हणून आमिर आणि जितेंद्र जोशी आले एकत्र
3 #SairatMania : महाराष्ट्रातनं थेट कर्नाटकात… ते बी एकटीच!
Just Now!
X