25 November 2020

News Flash

दीपिकाची हॉलीवूड वारी!

ऐश्वर्या राय बच्चन, मल्लिका शेरावत या बॉलीवूडमधील अभिनेत्रींनी हॉलीवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे.

| September 7, 2013 12:05 pm

ऐश्वर्या राय बच्चन, मल्लिका शेरावत या बॉलीवूडमधील अभिनेत्रींनी हॉलीवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. आता यांमध्ये ‘चेन्नई एक्स्प्रेस’च्या यशाचा आनंद घेत असलेल्या दीपिकाचेही नाव जोडले गेले आहे. हॉलीवूडच्या ‘फास्ट अॅण्ड फ्युरियस’ चित्रपटाच्या सिक्वलमध्ये दीपिका काम करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या चित्रपटाच्या सातव्या सिक्वलमध्ये ती व्हिन डिसेलसोबत काम करताना दिसेल. तसेच, दीपिकासह जॅसन स्टॅथम आणि ड्‌वेन जॉन्सन हे हॉलिवूडचे आघाडीचे अभिनेते चित्रपटात काम करणार आहेत. हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.
सध्या दीपिका दुबईमध्ये फराह खानच्या ‘हॅपी न्यू इयर’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. तसेच, ती लवकरच रजनीकांतसोबत तमिळ चित्रपट ‘कोचादैय्या’मध्ये दिसणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 7, 2013 12:05 pm

Web Title: deepika padukone bags a role in fast the furious 7
Next Stories
1 सैफसाठी करिनाचा डान्स
2 ‘बॉम्बे वेल्वेट’मध्ये अनुष्काची दुहेरी भूमिका
3 पहा व्हिडिओ : मेणाचा ‘प्रभू देवा’!
Just Now!
X