News Flash

कंगनाला मागे टाकत दीपिका बनली नंबर १ ची अभिनेत्री

आगामी 'पद्मावती'साठी मानधनात वाढ केल्याची चर्चा...

बॉलिवूडमध्ये येताना कधी तरी नंबर १ ची अभिनेत्री बनण्याचं स्वप्न प्रत्येकाचेच असते. नंबर १ ची अभिनेत्री म्हटलं की मग पैशांच्या बाबतीतही ते मागे कसे राहणार. आतापर्यंत बॉलिवूडची ‘क्वीन’ कंगना रणौत ही सगळ्यात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री होती असे म्हंटले जायचे. पण, आता तिला मागे टाकलंय ते बॉलिवूडच्या ‘मस्तानी’ दीपिका पदुकोणने.
प्रत्येक चित्रपटासाठी ११ कोटी रुपये मानधन घेते असा दावा कंगनाने केला होता. पण त्यात तथ्य नसून ती चित्रपटासाठी साधारण ३ कोटींपर्यंत मानधन घेते. पण, दीपिका यात पूढे जाताना दिसत आहे. सध्या तिच्या नावाची चलती असल्यामुळे प्रत्येक चित्रपटासाठी ती साधारणपणे ८ ते ९ कोटी रुपये एवढे मानधन घेते.
आता शिखरावर असताना मानधनात वाढ नाही केली तरच नवल.. आगामी ‘पद्मावती’साठी ती याहीपेक्षा अधिक मानधन घेत असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात येत आहे. हॉलिवूडनंतरचा ‘पद्मावती’ हा पहिलाच चित्रपट असल्यामुळे या चित्रपटापासून तिने आपल्या मानधनात काही कोटींची वाढ केली आहे. त्यामुळे साधारणपणे १० ते ११ कोटींपर्यंत तिचे सध्याचे मानधन गेल्याचे सुत्रांकडून सांगण्यात येत आहे.
तिचे हे मानधन अभिनेत्यांच्या तोडीचे असल्याचेही समजले जाते. त्यामुळे पैशांच्या या शर्यतीत कंगनापेक्षा दीपिकाच उजवी ठरल्याचे दिसत आहे. भविष्यात दीपिकाचा हा मानधनाचा आकडा कोणी मोडतं का तेच बघणं उत्सुकतेचे ठरेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 28, 2016 9:07 pm

Web Title: deepika padukone beaten kangana ranaut to be the highest paid actress
Next Stories
1 कास्टिंग काऊचची शिकार सई ताम्हणकर
2 ‘ए फ्लाईंग जट’मधूनही अरिजित बाहेर…
3 मराठी चित्रपट निर्मितीत जॉन अब्राहमचे पदार्पण…?
Just Now!
X