अभिनेत्री दीपिका पदुकोण तिच्या निखळ सौंदर्यांने आणि स्मितहास्याने सर्वांचीच मनं जिंकते. बॉलिवूडमध्ये आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या दीपिकाने हॉलिवूडमध्येही तितकीच उत्कृष्ट कामगिरी केली. दीपिकाची अॅकेडमी ऑफ मोशन पिक्चर ऑफ आर्ट्स अँड सायन्सचे (AMPAS) सदस्यत्व मिळाले असून ट्विटरवर तिने चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली. ‘अकादमीच्या सदस्यत्वाचा सन्मान मिळाला,’ असे ट्विट दीपिकाने केले.

AMPAS ने मागील महिन्यात ५७ देशांमधील ७७४ नवीन सदस्यांना संस्थेच्या सदस्यत्वासाठी निमंत्रित केले. दीपिकासोबतच प्रियांका चोप्राचाही यात समावेश आहे. यासंदर्भात प्रियांका म्हणाली की, ‘जगभरातील लोकांचा यात समावेश केल्याबद्दल मी अकादमीची आभारी आहे. अकादमीचे सदस्य म्हणून आमचे मत ते जाणून घेतात.’ या सदस्यांमध्ये ‘पिकू’ चित्रपटात दीपिकासोबत भूमिका साकारलेल्या बिग बी आणि इरफान खानचाही समावेश आहे.

PHOTO : …जेव्हा राजामौली ‘भल्लालदेव’सोबत फोटो काढतात

ऑस्करमध्ये मतं नोंदवण्यासाठी अकादमीमध्ये निमंत्रित केलेल्या भारतीयांमध्ये आमिर खान, ऐश्वर्या राय बच्चन, दिग्दर्शक गौतम घोसे आणि सलमान खान  यांचाही समावेश आहे. मात्र यामध्ये शाहरूख खानचे नाव नसल्याने मात्र आश्चर्य व्यक्त करण्यात येतेय.