बॉलिवूडमधील सर्वांचे लाडके आणि आवडते कपल म्हणजे अभिनेत्री दीपिका पदूकोण आणि रणवीर सिंग. ही बाजीराव-मस्तानीची जोडी सोशल मीडियाद्वारे सतत चाहत्यांशी संवाद साधताना तसेच त्यांच्या आयुष्यातील गोष्टी सांगताना दिसतात. नुकताच या कपलने त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा करण्यासाठी सुवर्ण मंदिर आणि तिरुपती मंदिरात दर्शन घेतले. दरम्यान त्या दोघांचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. आता दीप-वीरचा आणखी एक मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

व्हायरल झालेल्या रणवीर आणि दीपिकाच्या व्हिडीओमध्ये दीपिका कात्रीने रणवीरची मिशी कापण्याचा प्रयत्न करत आहे. हे करत असताना दीपिकाच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा आहे. दीपिकाने रणवीरची मिशी कापल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहून तुम्हाला नक्की हसू येईल. ‘फिल्मी ज्ञान’ या बॉलिवूड पेजने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. एका तासात हा दीप-वीरचा व्हिडीओ ४ लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तसेच चाहत्यांनी दीप-वीरवर लाईक आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.

 

View this post on Instagram

 

These two are pure cuteness and that’s how a couple should be like Don’t you agree?

A post shared by F I L M Y G Y A N (@filmygyan) on

लवकरच दीपिका आणि रणवीर ’83’ चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. २५ जून १९८३ रोजी लंडनमधील लॉर्ड्सच्या मैदानावर भारतीय संघाने क्रिकेट विश्वचषक जिंकला होता. याच विजयगाथेवर आधारित ’83’ हा चित्रपट आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा चित्रपट दिग्दर्शक कबीर खान सांभाळत आहे. चित्रपटाच्या टीममध्ये रणवीर सिंग, एमी विर्क, चिराग पाटील ,साकीब सलीम ,ताहिर भसीन ,जतिन सरना ,जीवा, आदिनाथ कोठारे, साहिल खट्टर,पंकज त्रिपाठी हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. तसेच अभिनेत्री दीपिका पादूकोण कपिल देव यांच्या पत्नी रोमी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट १० एप्रिल २०२० रोजी प्रदर्शित होणार आहे.

आणखी वाचा : जाणून घ्या रणवीर दीपिकाची लव्ह स्टोरी

या पूर्वी दीपिका रणवीर २०१३ मध्ये ‘गोलियों की रासलीला राम-लीला, २०१५ मध्ये प्रदर्शित झालेला ‘बाजीराव- मस्तानी’ आणि ‘पद्मावत’ या चित्रपटात एकत्र झळकले होते. या व्यतिरिक्त त्या दोघांनी ‘फाइनडिंग फॅनी’ चित्रपटात एकत्र काम केले होते. त्यांची ऑनस्क्रिन केमिस्ट्री पुन्हा पाहण्यासाठी चाहते फार उत्सुक आहेत.