27 November 2020

News Flash

…म्हणून दीपिकाने सोशल मीडियावर बदललं तिचं नाव

दीपिकाने ठेवलंय 'हे' खास नाव

दीपिका पदुकोण, (संग्रहित छायाचित्र)

शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांचा ‘ओम शांती ओम’ हा चित्रपट साऱ्यांच्याच लक्षात असेल. २००७ मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट त्याकाळी तुफान गाजला होता. या चित्रपटाच्या माध्यमातून दीपिका पदुकोणने कलाविश्वात पदार्पण केलं होतं. त्यामुळे तिच्या करिअरमधील हा महत्त्वाचा चित्रपट असल्याचं म्हटलं जातं. अलिकडेच या चित्रपटाला १३ वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्ताने दीपिकाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटचं नाव बदलल्याचं पाहायला मिळालं.

‘ओम शांती ओम’ या चित्रपटात दीपिकाने शांतीप्रिया ही भूमिका साकारली होती. त्यामुळे तिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर तिचं नाव बदलून शांतीप्रिया असं ठेवलं आहे. सोबतच तिने डिस्प्ले इमेजदेखील बदलल्याचं पाहायला मिळत आहे. डिस्प्ले इमेजवर तिने ओम शांती ओम चित्रपटातील शाहरुख आणि तिचा फोटो लावला आहे.

दरम्यान, ‘ओम शांती ओम’नंतर दीपिकाच्या लोकप्रियतेत तुफान वाढ झाली. दीपिका आज लोकप्रिय सेलिब्रिटींपैकी एक असून तिने अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. यामध्ये पिकू, मस्तानी, रानी पद्मावती, मीनाम्मा, नैना या तिच्या भूमिका प्रचंड गाजल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 10, 2020 2:28 pm

Web Title: deepika padukone debut film om shanti om named shantipriya on instagram twitter ssj 93
Next Stories
1 ‘मुंबई का किंग कौन? मुंबई पोलीस’, दिग्दर्शकाचा अर्णबला टोला
2 शिल्पा शेट्टी म्हणते, “या एकाच अटीवर मी सुनेला माझी २० कॅरेट डायमंडची अंगठी देईन”
3 भावाच्या लग्नानंतरच येणार; मुंबई पोलिसांच्या समन्सला कंगनाचं उत्तर
Just Now!
X