प्रत्येक मुलीला भविष्यात तिच्या वडिलांप्रमाणे मोठं व्हायचं असतं. याचे एक चांगले उदाहरण म्हणजे दीपिका पादुकोणचे वक्तव्य. नुकताच झालेल्या एका मुलाखतीमध्ये दीपिकाने खेळाशी संबंधीत बायोपिक तयार करण्यात आला तर तो माझ्या वडिलांवर असावा असे सांगितले. दरम्यान या बायोपिकमध्ये तिला काम करायला आवडेल अशी इच्छादेखील तिने व्यक्त केली आहे.

बॉम्बे टाईम्ससह झालेल्या एका मुलाखतीमध्ये दीपिकाला जर खेळा संबंधीत बायोपिक काढण्यात आला तर कोणावर काढावा असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर दीपिकाने तिचे वडिल प्रकाश पादुकोण यांचा बायोपिक काढण्यात यावा असे सांगितले. तसेच पुढे तिने या चित्रपटात काम करण्याची इच्छा देखील व्यक्त केली आहे. दीपाकाचे वडिल प्रकाश पादुकोण हे एक लोकप्रिय बॅटमिंटनपटू आहेत.

सध्या दीपिका तिचा आगामी चित्रपट ‘छपाक’मध्ये व्यग्र आहे. अॅसिड हल्ल्यातून बचावलेल्या लक्ष्मी अगरवालच्या जीवनावर आधारित या चित्रपटाचे दिग्दर्शन मेघना गुलजार करत असून दीपिकासह या चित्रपटात विक्रांत मेसी देखील झळकणार आहे. हा चित्रपट १० जानेवारी २०२० प्रदर्शित होणार आहे.  त्यानंतर दीपिका रणवीर सिंगसह ’83’ चित्रपटात काम करणार आहे. या चित्रपटात दीपिका कपील देव यांची पत्नी रोमी यांच्या भूमिकेत दिसणार आहे.