10 August 2020

News Flash

दीपिका पदुकोणकडून चित्रपटासाठी मिळणाऱ्या मानधनात वाढ

प्रसिध्द बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणने चित्रपटासाठी मिळणाऱ्या मानधनात खूप मोठ्याप्रमाणावर वाढ केली असून, हिंदी चित्रपटसृष्टीतील ती सर्वात जास्त मानधन आकारणारी अभिनेत्री ठरली आहे.

| June 5, 2014 06:13 am


प्रसिध्द बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणने चित्रपटासाठी मिळणाऱ्या मानधनात खूप मोठ्याप्रमाणावर वाढ केली असून, हिंदी चित्रपटसृष्टीतील ती सर्वात जास्त मानधन आकारणारी अभिनेत्री ठरली आहे. २०१३ मध्ये एका पाठोपाठ एक हिट चित्रपट देणाऱ्या दीपिकाचे लोकांनी खूप कौतूक केल आणि तिला प्रमुख अभिनेत्रींच्या यादीत नेऊन बसवल. सुपरहिट चित्रपट ‘रामलीला’नंतर तर दिपिकाचा तोरा अजूनच वाढला असून, तिने संजय लिला भन्साळींच्या ‘बाजीराव मस्तानी’ या आगामी चित्रपटासाठी ८ कोटी एवढ्या मोठ्या मानधनाची आकारणी केली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार याआधी दिपाका एका चित्रपटासाठी ३ कोटी रुपये एवढे मानधन आकारत असे, परंतु आता तिने आपल्या मानधनात वाढ करून ते ८ कोटी इतके केले आहे.
 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 5, 2014 6:13 am

Web Title: deepika padukone gets 8 crore for sanjay leela bhansali film bajirao mastaani
Next Stories
1 ‘सुबह सुबह’ची प्रसिद्धी करण जोहर करणार
2 ताऱ्यांची तारेवरची कसरत!
3 विजय गटलेवार.. संगीतकार!
Just Now!
X