अभिनेत्री दीपिका पदुकोण सध्या तिच्या ‘पद्मावत’ सिनेमामुळे चर्चेत आहे. उत्तम अभिनयामुळे तिची सर्व स्थरातून प्रशंसा तर होत आहेच याशिवाय दीपिका सध्या अजून एका कारणामुळे चर्चेत आली आहे. आता तुम्हाला वाटेल की रणवीर सिंगमुळे ती चर्चेत आली असेल, पण असे काही नाही. दीपिकाने तिच्या बाबांना प्रकाश पदुकोण यांना एक महागडी गाडी भेट म्हणून दिली.

https://www.instagram.com/p/Be9vgiqBcW0/

माजी बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण यांना नुकतेच लाइफटाइम अचिव्हमेण्ट अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला संपूर्ण पदुकोण कुटुंबियांनी आवर्जुन उपस्थिती लावली होती. बाबांना हा सन्मान मिळाल्याच्या खुशीत तिने बाबांना एक आलिशान गाडी भेट म्हणून दिली. आता मुलीने दिलेली भेट वडिलांना आवडणार नाही असे तर होणार नाही.’मुंबई मिरर’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, दिल्लीमध्ये प्रकाश पदुकोण बॅडमिंटन एसोसिएशन ऑफ इंडियातर्फे प्रकाश यांना लाइफटाइम अचिव्हमेण्ट अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान त्यांनी भाषणही दिले.

https://www.instagram.com/p/BesNyKGB9Ip/

दीपिकाने तिच्या घरातील वातावरणाबद्दल बोलताना सांगितले की, ती जगासाठी सुपरस्टार असली तरी घरी ती सुपरस्टार नसून घरातील एक सदस्यच असते. महागडी गाडी देण्याआधी दीपिकाने तिच्या आई- वडिलांना ४० कोटींचे घर भेट म्हणून दिले होते. दीपिकाच्या टॉवरच्या बाजूच्याच टॉवरमध्ये ३० व्या मजल्यावर तिने हे घर बूक केले. काही दिवसांपूर्वी अमिताभ बच्चन यांनी पद्मावत सिनेमातील तिच्या अभिनयाचे कौतुक केले होते. अमिताभ यांनी तिच्यासाठी कौतुक करणारे पत्र लिहून तिला फुलांचा गुच्छ दिला. दीपिकाने फुलांचा गुच्छ आणि पत्र असलेला फोटो तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला.