News Flash

Video : ‘पल में रुला दिया’; इरफान खानच्या आठवणीत दीपिका भावूक

'पिकू'च्या सेटवरील इरफानचा एक व्हिडीओ दीपिकाने सोशल मीडियावर पोस्ट केला.

इरफान खान, दीपिका पदुकोण

अभिनेता इरफानच्या खानच्या आठवणीत भावूक झालेल्या दीपिका पदुकोणने सोशल मीडियावर त्याच्यासोबतचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट केले आहेत. दोघांनी ‘पिकू’ या चित्रपटात एकत्र काम केलं होतं आणि त्यादरम्यान दोघांमध्ये चांगली मैत्रीसुद्धा झाली होती. पिकूच्या सेटवरील इरफानचा फोटो दीपिकाने पोस्ट केला आहे. या फोटोसोबतच तिने चित्रपटातील ‘लम्हें गुजर गए’ या गाण्याच्या ओळी लिहिल्या आहेत.

‘लम्हे गुज़र गये, चेहरे बदल गये, हम थे अंजानी राहो में पल में रुला दिया, पल में हसा के फिर, रह गये हम जी राहो में थोड़ा सा पानी है रंग है
थोड़ी सी छावो है,’ असे या गाण्याचे बोल आहेत. यासोबतच तिने सेटवरचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत दीपिका व इरफान टेनिस खेळताना दिसत आहेत. ‘तू परत ये’, असं लिहित दीपिकाने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

आणखी वाचा : ‘तुझी जाण्याची वेळ योग्य नव्हती…’ एका चाहतीचं इरफानसाठी पत्र…

मुंबईत २९ एप्रिल रोजी इरफान खानचं निधन झालं. कॅन्सरशी त्याची झुंज अपयशी ठरली. ‘एक सच्चा कलाकार गमावला’,अशा शब्दांत चाहत्यांनी, सिनेसृष्टीतील कलाकारांनी भावना व्यक्त केल्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 9, 2020 3:37 pm

Web Title: deepika padukone got emotional in the memories of irrfan khan ssv 92
Next Stories
1 लॉकडाउनमध्ये रंगणार पुरस्कार सोहळा? जाणून घ्या, कुठे आणि कधी
2 ‘वो क्युँ उदास हो गई’; मदर्स डेसाठी आयुषमानचं खास गाणं
3 “आपल्या कमकुवत प्रशासनाकडे एकदा बघा”; औरंगाबाद दुर्घटनेवर संतापले प्रकाश राज
Just Now!
X