News Flash

‘पद्मावत’ची चिंता सोडून सध्या ‘हे’ करतेय दीपिका पदूकोण

यासाठी फार स्थिरता लागते

दीपिका पदुकोण

पद्मावत या सिनेमामुळे सध्या दीपिका पदुकोण भलतीच चर्चेत आले. या सिनेमाचे भवितव्य अजूनही अंधारात असलं तरी याची फारशी चिंता दीपिका करताना दिसत नाही. ज्या गोष्टींवर आपले नियंत्रण नाही अशा गोष्टींची चिंता करत बसण्यापेक्षा सध्या ती तिचा वेळ जिममध्ये घालवत आहे. दीपिकाच्या जिम ट्रेनरने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती फॉरवर्ड लंग्ज एक्सरसाइज करताना दिसत आहे.

दीपिकाची ट्रेनर यास्मीन कराचीवालाने हा व्हिडिओ शेअर करताना लिहिले की, ‘दीपिका वुंडा चेअरवर व्यायाम करत आहे. ती इतक्या सहजतेने व्यायाम करतेय याकडे पाहून हा व्यायाम सोपा आहे असा समज करु नका. यासाठी फार स्थिरता लागते.’ दीपिका आपल्या फिटनेसकडे फार लक्ष देते. बॉलिवूडमधील सर्वात फिट अभिनेत्रींमध्ये तिचे नाव आवर्जुन घेतले जाते. जेव्हा ती कोणत्याही सिनेमांचे चित्रीकरण करत नाही. तेव्हा ती अधिकतर वेळ जिममध्येच घालवते.

दीपिकाचा ‘पद्मावत’ सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. सेन्सॉर बोर्डाकडून अजूनही या सिनेमाला हिरवा कंदील मिळाला नसला तरी येत्या २५ जानेवारीला हा सिनेमा प्रदर्शित होईल असे म्हटले जात आहे. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित या सिनेमात दीपिका पदुकोण, रणवीर सिंग आणि शाहिद कपूर यांच्या मुख्य भूमिका आहेत. या सिनेमाविरोधात अनेक राज्यांमध्ये अजूनही प्रदर्शनं केली जात आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 13, 2018 9:16 pm

Web Title: deepika padukone gym deepika padukone video viral cbfc padmavat padmavat release
Next Stories
1 फॅशन डिझायनर सब्यसाचीमुळे भावूक झाली राणी मुखर्जी
2 Padmavat- आता ‘घूमर’ गाण्यात दिसणार नाही दीपिका पदुकोणची कंबर?
3 Big Boss 11- टॅरो कार्ड रिडरची भविष्यवाणी खरी ठरली तर हा स्पर्धक होईल विजेता
Just Now!
X