बॉलिवूडची मस्तानी अभिनेत्री दीपिका पादुकोण लवकरच शाहरुख खानच्या ‘पठाण’ या चित्रपटात दिसणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. दरम्यान सोशल मीडियावर दीपिकाचा एक जुना व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये दीपिका दिग्दर्शक रोहित शेट्टीशी भांडताना दिसत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये दीपिका काही तरी खाताना दिसत आहे. तिच्या एका हातामध्ये बिस्कीट आणि दुसऱ्या हातामध्ये कोल्ड ड्रिंकची बाटली दिसत आहे. दीपिका बिस्किट खात असताना रोहित शेट्टी तिला थांबवतो. त्यानंतर ती कोल्ड ड्रिंक पित असताना देखील रोहित शेट्टी तिला थांबलतो. दरम्यान रोहित दीपिकाला त्रास देताना दिसत आहे.
View this post on Instagram
दीपिकाचा राग अनावर होतो आणि ती कोल्ड ड्रिंकची बाटली रोहित शेट्टीच्या डोक्यावर फोडते. त्यानंतर रोहितच्या डोक्याला मार लागला असल्याचे व्हिडीओमध्ये दाखवण्यात आले आहे. रोहितने इजा झाल्याचे दाखवण्यासाठी डोक्याला टॉमेटॉ केचप लावल्याचे दिसत आहे. त्यांचा हा मस्ती करतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. पण हा व्हिडीओ कोणत्या चित्रपटाच्या सेटवरील आहे याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
लवकरच दीपिका शाहरुख खानसोबत ‘पठाण’ या चित्रपटात दिसणार असल्याचे म्हटले जात आहे. या चित्रपटात अभिनेता जॉन अब्राहम देखील खलनायकाच्या भूमिकेत दिसणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. जानेवारी महिन्यात दीपिका चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरुवात करणार असल्याचे म्हटले जाते.
दीपिका आणि शाहरुखने आतापर्यंत ‘ओम शांति ओम’, ‘हॅप्पी न्यू ईअर’ आणि ‘चेन्नई एक्सप्रेस’ या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. आता त्यांना पुन्हा ‘पठाण’ चित्रपटात एकत्र पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 24, 2020 6:52 pm