20 February 2019

News Flash

दीपिकाचा हॉलीवूड चाहता

दीपिकाच्या चाहत्यांच्या यादीत निक जॉन्स या हॉलीवूड कलाकाराची भर पडली आहे.

दीपिका पदुकोण

दीपिका आणि प्रियांका यांनी सहकलाकार म्हणून काम केले असले तरी त्या मैत्रिणी नाहीत हे अख्ख्या ‘बॉलीवर्ल्ड’ला माहीत आहे. त्यातच प्रियांका सध्या दीपिकाची सवत होणार का? या प्रश्नाने ग्रासली आहे. याबाबत रणवीरवर संशय घेण्याची अजिबात गरज नाही. रणवीर तर दीपिकाचाच चाहता आहे. पण दीपिकाच्या चाहत्यांच्या यादीत निक जॉन्स या हॉलीवूड कलाकाराची भर पडली आहे. खरंतर निक हा प्रियांकाचा मित्र. त्यांच्यातील नात्याच्या चर्चाही सुरू आहेत. अशातच निकने दीपिकाच्या फोटोवर काही ‘प्रेमळ स्माइल’ असणारी कमेंट टाकली आहे. प्रियांकांसोबतच्या नात्यांच्या प्रश्नांवर प्रतिक्रिया देताना. निकने प्रियांका आणि मी एकत्र असतो, मग त्यात काय असं म्हणत अफवांना उडवून लावलं आहे. त्याच वेळी तो असंही म्हणाला की मी प्रियंकाकडून भारताविषयी फार काही ऐकलंय. तिथे जाण्याची माझी इच्छा आहे आणि तेथील काही व्यक्तींना भेटण्यास मी फारच उत्सुक आहे. निकच्या दीपिकाच्या फोटोवरील ‘कमेंट’नंतर प्रियांका ती व्यक्ती दीपिका नसावी अशी प्रार्थना तर करत नसेल?

मसक्कली

First Published on February 14, 2018 3:12 am

Web Title: deepika padukone hollywood fan