‘ओम शांती ओम’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री दीपिका पदुकोण आज कलाविश्वातील नावाजलेली अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. ‘बाजीराव मस्तानी’, ‘चेन्नई एक्स्प्रेस’,’रामलीला’ या चित्रपटांमधील दीपिकाच्या भूमिका विशेष गाजल्या. या चित्रपटांच्या यशानंतर दीपिका लवकरच ‘छपाक’ आणि ’83’ या चित्रपटामध्ये झळकणार आहे. त्यामुळे सध्या चाहत्यांमध्ये दीपिकाची चर्चा आहे. या चित्रपटांप्रमाणेच दीपिका एका व्हिडीओमुळेदेखील चर्चेत आली आहे.
काही दिवसांपूर्वी दीपिकाला मुंबई विमानतळावर स्पॉट करण्यात आलं. यावेळी दीपिका विमानतळावरुन बाहेर पडत होती. दीपिकाला पाहताच क्षणी तिची एक छबी कॅमेरामध्ये कैद करण्यासाठी अनेक छायाचित्रकार पुढे सरसावले. विशेष म्हणजे दरवेळीप्रमाणे दीपिकाने हसून फोटो काढण्यास परवानगी दिली. यावेळी हसत हसतच दीपिकाने एका फोटोग्राफरला ‘ये बस’ असं म्हणाली. तिच्या या वाक्यानंतर तेथे उपस्थित असलेले सारेच हसू लागले.
View this post on Instagram
#deepikapadukone invites us for a drive . #airportdiaries #viralbhayani @viralbhayani
दीपिकाला पाहिल्यानंतर अनेक छायाचित्रकारांनी विमानतळाच्या गेटपासून ते तिच्या गाडीपर्यंतचे तिचे फोटो काढण्यास सुरुवात केली. जेव्हा दीपिका गाडीजवळ पोहोचली तेव्हाही तिचे फोटो काढणं सुरुच होतं. छायाचित्रकारांचा हा उत्साह पाहून ती पटकन एका छायाचित्रकाराला मजेशीर अंदाजामध्ये ये बस असं सांगते.
दरम्यान, या व्हिडीओमध्ये दीपिकाने सिल्वर रंगाची ट्राइझर आणि पांढऱ्या रंगाचा टॉप घातला होत. तर सिल्वर रंगाचे हिल्स घातले होते. दीपिकाचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 26, 2019 12:01 pm