23 July 2019

News Flash

Sexiest Asian Woman : दीपिका पुन्हा एकदा ठरली ‘नंबर वन’

दीपिकाने अभिनेत्री प्रियांका चोप्राला मागे टाकत हे स्थान पटकावलं आहे.

अभिनेत्री दीपिका पदुकोण

‘सेक्सिएस्ट एशियन वूमन’च्या यंदाच्या यादीत अभिनेत्री दीपिका पदुकोणने पुन्हा एकदा बाजी मारली आहे. गेल्या वर्षी प्रियांका चोप्राने दीपिकाला मागे टाकलं होतं. मात्र यावर्षी दीपिकाने पुन्हा एकदा बाजी मारत अग्रस्थान पटकावलं आहे. मागील तीन वर्षांमध्ये दुसऱ्यांदा दीपिकाने पहिलं स्थान मिळवलं आहे.

चाहत्यांमध्ये लोकप्रिय असलेल्या दीपिकासाठी यंदाचं वर्ष खास ठरलं आहे. या वर्षात दीपिकाच्या आयुष्यात बऱ्याच घडामोडी घडल्या. यामध्ये तिने आपल्या यशाचा चढता आलेख कायम राखला. दीपिकाने नुकतंच अभिनेता रणवीर सिंहसोबत लग्नगाठ बांधली. त्यानंतर लगेच तिच्या पदरामध्ये ‘सेक्सिएस्ट एशियन वूमन’ अॅवॉर्ड पडलं आहे. त्यामुळे यंदाचं वर्ष दीपिकासाठी चांगलंच खास असल्याचं दिसून येत आहे.

लंडन येथील ‘इस्टर्न आय’ या साप्ताहिकाने घेतलेल्या पोलनुसार, ५० सेक्सिएस्ट एशियन वूमनची यादी जाहीर करण्यात आली. या यादीत पहिल्या स्थानावर दीपिका पदुकोण, दुसऱ्या स्थानावर प्रियांका चोप्रा, तिसऱ्या क्रमांकावर निया शर्मा तर चौथ्या आणि पाचव्या स्थानावर अनुक्रमे पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान, शिवांगी जोशी या आहेत.

जानेवारीमध्ये प्रदर्शित झालेल्या ‘पदमावत’ या चित्रपटामुळे दीपिकाच्या करिअरला चांगलीच कलाटणी मिळाली असून या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर भरघोस कमाई केली. या चित्रपटामध्ये मस्तानीची भूमिका वठविली होती. तिच्या या भूमिकेनंतर दीपिकाच्या चाहत्या वर्गामध्ये कमालीची वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे.

First Published on December 7, 2018 12:05 pm

Web Title: deepika padukone is back as the reigning queen is named sexiest asian woman