25 February 2021

News Flash

दीपिका हॉटेलमधून चोरायची ‘ही’ वस्तू

दीपिकाच्या वेबसाईटवर तिच्या मैेत्रीणी ही पोस्ट केली आहे

दीपिका पदुकोण

आपल्या आयुष्यात मैत्रीचे नाते हे फार महत्वाचे असते. कधी कधी आपल्या मनात असलेल्या भावना किंवा काही गोष्टी आपण आपल्या कुटुंबीयांसोबत शेअर करत नाही. मग अशा वेळी आपण त्या गोष्टी आपल्या मित्रमैत्रीणींसोबत शेअर करतो. त्यामुळे आपल्या खास मित्राला आपल्या सगळ्या खाजगी गोष्टी माहिती असतात. बॉलिवूड कलाकरांमध्ये ही अशी मैत्री पाहायला मिळते. अभिनेत्री दीपिका पदूकोणच्या खास मैत्रीणीने दीपिकाच्या आयुष्यातील काही रहस्य उलघडली आहेत.

नुकताच दीपिकाने तिची स्वत:ची वेबसाईट सुरु केली आहे. अभिनेता रणवीर सिंग, ड्रेस डिझायनर सब्यसाची, मेघना गुलजार आणि इम्तियाज अली यांनी या वेबसाईटच्या माध्यमातून दीपिकाबद्दल काही गोष्टी सांगितल्या होत्या.आता दीपिकाची खास मैत्रीण स्नेहा रामचंदरने दीपिकासाठी एक पोस्ट लिहिली आहे. तिने या पोस्टमध्ये दीपिकाची काही रहस्य सांगितली आहेत.

‘तुम्ही अशा व्यक्तीला ओळखता का ज्याच्यासोबत तुम्ही कित्येक तास गप्पा मारू शकता, आनंदी आणि नाजार असतानादेखील त्या व्यक्तीसोबत राहू शकता, ज्या व्यक्तीच्या डोळ्यात तुमच्या विषयी काळजी दिसेत… कोणी असं जो नेहमी स्वत:ला व्यवस्थित ठेवतो आणि तुमचे घरही आनंदाने भरुन टाकतो. तुम्ही अशा व्यक्तीला ओळखता का जो तुमच्यासाठी तुमच्या आवडीचे शॅम्पू हॉटेलमधून चोरुन गोळा करुन ठेवतो. मी ओळखते अशा व्यक्तीला आणि ती म्हणजे माझी खास मैत्रीण दीपिका पदूकोण’ असे स्नेहाने पोस्टमध्ये लिहिले आहे. सध्या ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

अॅसिड हल्ल्यातून बचावलेल्या लक्ष्मी अगरवालच्या जीवनावर आधारित मेघना गुलजार यांच्या ‘छपाक’ या चित्रपटात दीपिका मुख्य भूमिकेत दिसणार आहे. दीपिकासोबत अभिनेता विक्रांत मेस्सीदेखील झळकणार आहे. छपाक हा चित्रपट १० जानेवारी २०२० रोजी प्रदर्शित होणार आहे. त्यानंतर दीपिका ’83’ चित्रपटात कपिल देव यांच्या पत्नी रोमी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. तसेच या चित्रपटात रणवीर सिंग कपिल देव यांची भूमिका साकारणार आहे. लग्नानंतरचा दीपिका आणि रणवीरचा हा पहिला एकत्र चित्रपट असणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 3, 2019 9:06 am

Web Title: deepika padukone is robbing this thing from hotel avb 95
Next Stories
1 हिंमत असेल तर ‘मिशन मंगल’ सिनेमा मराठीत डब करुन दाखवाच-मनसे
2 चित्र रंजन : मूक ‘आवाज’
3 Photos : अभिजीत बिचुकलेची पत्नी ‘बिग बॉस’च्या घरात
Just Now!
X