28 September 2020

News Flash

‘इमली’ चित्रपटात कंगना ऐवजी दीपिकाची वर्णी?

कंगनाचा या चित्रपटातून काढता पाय

बॉलिवूड चित्रपट निर्माते अनुराग बासू यांचा आगमी चित्रपट ‘इमली’ची घोषणा करताच चाहत्यांमध्ये चित्रपटा बाबतची उत्सुकता वाढली आहे. पहिले या चित्रपटात कंगना रणौत मुख्य भूमिकेत दिसणार होती. ‘पंगा’, ‘मेंटल है क्या’, ‘तनू वेड्स मनू ३’ आणि जयललिता यांचा बायोपिक असे चार चित्रपट सध्या तिच्या पदरात असल्याने कंगनाने ‘इमली’ चित्रपटातून काढता पाय घेतला होता. आता या चित्रपटात कोणती अभिनेत्री झळकणार याची सर्वत्र चर्चा सुरु आहे.

अनुराग बासूच्या ‘इमली’ या चित्रपटात कंगना ऐवजी अभिनेत्री दीपिका पादुकोण झळकणार असल्याचे म्हटले जात आहे. चाहत्यांसाठी हा सुखद धक्काच असणार आहे. ‘डीएनए’ वृत्तवाहिनीसह झालेल्या संभाषणात अनुराग यांनी कंगना सध्या तिच्या आगामी चित्रपटांच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र असल्यामुळे तिला इमली चित्रपटाला वेळ देता येत नसल्याचे सांगितले आहे. तसेच त्यांनी या भूमिकेसाठी दीपिकाला विचारले आहे. परंतु दीपाकाने होकार कळवल्याशिवाय ते कोणतीही अधिकृत घोषणा करणार नसल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे.

सध्या दीपिका तिचा आगामी चित्रपट ‘छपाक’मध्ये व्यग्र आहे. या चित्रपटामध्ये दीपिकाने अॅसिड हल्ल्यातून बचावलेल्या लक्ष्मी अगरवालची भूमिका वठविली आहे. छपाक हा चित्रपट १० जानेवारी २०२० रोजी प्रदर्शित होणार आहे. त्यानंतर दीपिका रणवीर सिंगसह ’83’ चित्रपटामध्ये झळकणार आहे. या चित्रपटात दीपिका कपिल देव यांची पत्नी ‘रोमी देव’ यांची भूमिका साकारणार आहे. कबीर खान दिग्दर्शित हा चित्रपट १० एप्रिल २०२० रोजी प्रदर्शित होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 22, 2019 5:07 pm

Web Title: deepika padukone is star in imli movie avb 95
Next Stories
1 खंडणी प्रकरणी अभिजीत बिचुकलेला न्यायालयीन कोठडी
2 कबीर सिंग: शाहिदला मिळाली करिअरमधली सर्वात मोठी ओपनिंग
3 योग साधना करुन अर्जुनच्या वयाइतकं व्हायचं का? नेटकऱ्यांचा मलायकाला टोला
Just Now!
X