News Flash

शाहिदसाठी दीपिका खूपच उंच?

ऐतिहासिक कथेचा विचार करता राजपूत घराण्यांमध्ये राजा हे राण्यांपेक्षा उंच असायचे.

दीपिका पदुकोण आणि शाहिद कपूर

दिग्दर्शक संजय लीला भन्साली यांचा आगामी ‘पद्मावती’ हा चित्रपट सध्या बॉलीवूडमध्ये सर्वाधिक चर्चेचा विषय बनला आहे. नुकतीच या चित्रपटासाठी दीपिका पदुकोण आणि शाहिद कपूर यांची लूक टेस्ट घेण्यात आली होती. मात्र, आता या चित्रपटात नवा पेचप्रसंग निर्माण झाला आहे. ”पद्मावती’ चित्रपटातील अभिनेत्री ही अभिनेत्यापेक्षा उंच असल्याने दोघही पडद्यावर एकसारखे दिसावेत यासाठी मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरु आहे.

किस करताना दिसले रणवीर-दीपिका

भन्साली यांनी काही दिवसांपूर्वीच या ऐतिहासिक चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी सुरुवात केली. ‘पद्मावती’ हा चित्रपट ऐतिहासिक काळावर आणि पात्रांवर भाष्य करणाऱ्या कथानकावर आधारित असणार आहे. चित्रपटात दीपिका पदुकोण राणी पद्मावतीची भूमिका साकारणार असून शाहिद तिच्या पतीच्या म्हणजेच मेवारचे महाराणा रतन सिंग यांच्या भूमिकेत दिसेल. तर रणवीर सिंग हा पद्मावतीच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या अलाउद्दीन खिलजीच्या भूमिकेत दिसेल. ऐतिहासिक कथेचा विचार करता राजपूत घराण्यांमध्ये खास करून राजा हे राण्यांपेक्षा उंच असायचे. राजपूत घराण्यांमध्ये ही प्रथा पिढ्यानपिढ्या चालत आल्याचे पाहावयास मिळते. त्यामुळे या गोष्टीवर भन्साली अडकल्याचे दिसते. टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, शाहिद आणि दीपिका यांना सदर गोष्टीवर तोडगा काढण्यासाठी सांगण्यात आल्याचे कळते. आता दीपिकासोबत चित्रीकरणास सुरुवात केल्यावर शाहिद हिल्स घालणार की नाही ते लवकरच कळेल.

‘या’ फोटोतील दीपिकाला तुम्ही ओळखलंत का?

सध्या दीपिका तिच्या ‘xxx द रिटर्न ऑफ झेन्डर केज’ या हॉलीवूड चित्रपटाचेही प्रमोशन करत आहे. तर, दुसरीकडे रणवीर त्याच्या आगामी ‘बेफिक्रे’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. ‘पद्मावती’ व्यतिरीक्त शाहिद ‘रंगून’ या चित्रपटात कंगना रणौत आणि सैफ अली खान यांच्यासह झळकणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2016 2:51 pm

Web Title: deepika padukone is too tall for shahid kapoor
Next Stories
1 अजय देवगणची बॉलिवूडमध्ये पंचवीशी
2 मानधनाच्या बाबतीत हेमा मालिनी यांची दीपिका-प्रियांकाला टक्कर
3 ‘फिटनेस गुरू’च्या वाढदिवसाला पोहचले सेलिब्रिटी शिष्य
Just Now!
X