News Flash

दीपिकाच्या बिकीनी फोटोनं वाढवलं सोशल मीडियाचं तापमान

रणवीरही कमेंट करण्यापासून स्वत:ला रोखू शकला नाही.

एका मुलाखतीत बोलताना दीपिका पादुकोनने आपल्या पहिल्या पगारीबद्दलची माहिती दिली होती. ती यावेळी म्हणाली होती की, माझी पहिली कमाई किती होती आठवत नाही पण ती हजारात होती.

बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री दीपिका पदुकोण हिने नुकतंच बिकीनी फोटोशूट केलं आहे. एका मासिकासाठी तिने हे बोल्ड फोटोशूट केलं असून सोशल मीडियावर त्याचे काही फोटो दीपिकाने पोस्ट केले आहेत. दीपिकाने फोटो पोस्ट केल्यापासून त्यावर चाहत्यांकडून लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

दीपिकाच्या बिकीनीमधील फोटोंनी सोशल मीडियावरचं तापमान वाढवलं आहे, असं म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. या फोटोंवर तिचा पती रणवीर सिंगनेही कमेंट केली आहे. ‘बेबी, रहम करो यार’, असं रणवीरने लिहिलं आहे. लग्नानंतर अनेकदा दीपिकाला तिच्या फॅशन सेन्सवरून ट्रोल करण्यात आलं. रणवीरसोबत राहण्याचा परिणाम तुझ्यावर झालाय, असं अनेकांनी तिला चिडवलं होतं. मात्र मासिकासाठी केलेल्या या फोटोशूटनंतर दीपिकावर चांगल्या कमेंट्स वर्षाव होत आहे. काहींनी तिच्या बीचवरील फोटोचे मीम्ससुद्धा व्हायरल केले. त्यातला एक मीम दीपिकाने तिच्या इन्स्टा स्टोरीवर शेअर केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

पाहा फोटो : ‘का रे दुरावा’ फेम सोज्वळ सुरुचीचा हॉट अंदाज 

दीपिकाचा नुकताच ‘छपाक’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटातील तिच्या दमदार अभिनयाचं कौतुक झालं. ती लवकरच रणवीरसोबत झळकणार आहे. ’83’ या चित्रपटात रणवीर-दीपिका ऑनस्क्रीनसुद्धा पती-पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहेत. लग्नानंतर ते पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. त्यामुळे या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये फार उत्सुकता आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 9, 2020 4:23 pm

Web Title: deepika padukone latest bikini photo shoot is too hot to handle ssv 92
Next Stories
1 ट्रोल झालेल्या नुशरतच्या ‘त्या’ ड्रेसची किंमत ऐकून व्हाल थक्क!
2 ‘टकाटक’ फेम रितीका आता नव्या भूमिकेत
3 अग्गंबाई सासूबाई : सोहमच्या बेलगाम वागण्याला आसावरी देणार चपराकीने उत्तर
Just Now!
X