22 September 2020

News Flash

…म्हणून दीपिका पदुकोणने घेतला गोव्याला जाण्याचा निर्णय

शकुन बत्रांच्या आगामी चित्रपटात दीपिकाची वर्णी?

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणची तिच्या कामाप्रती असलेली एकनिष्ठा अनेकांना ठाऊक आहे. त्यामुळे लॉकडाउनच्या काळातदेखील दीपिका तिचं काम करत होती. मिळालेल्या या फावल्या वेळामध्ये दीपिकाने तिच्या आगामी चित्रपटाचं स्क्रिप्ट नरेशन( पटकथा वाचन) करत होती. मात्र आता ती खऱ्या अर्थाने कामाकडे वळली आहे.

दीपिका लवकरच शकुन बत्रा यांच्या आगामी चित्रपटात झळकणार आहे. त्यामुळे आता या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली असून गोव्यात काही सीनचं चित्रीकरण होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे या आगामी चित्रपटासाठी दीपिका गोव्यासाठी रवाना झाली आहे.
दीपिकाने तिच्या ब्रॅण्ड कमिटमेंट पूर्ण केल्या असून तिच्या टीमसोबत ती गोव्याला जाणार आहे. तसंच गोव्यात गेल्यानंतर लगेच चित्रीकरणाला सुरुवात होईल, असं सांगण्यात येत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on


दरम्यान, शकुन बत्रा यांच्या आगमी चित्रपटाविषयी अद्याप फारसा खुलासा करण्यात आलेला नाही. त्यामुळे या चित्रपटाचं नाव किंवा त्यात झळकणाऱ्या कलाकारांची नावं गुलदस्त्यात असल्याचं पाहायला मिळत आहे. तसंच या चित्रपटाव्यतिरिक्त दीपिका दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभाससोबत एका चित्रपटात झळकणार असल्याचं दिसून येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 11, 2020 12:31 pm

Web Title: deepika padukone leave for goa to shoot her upcoming film ssj 93
Next Stories
1 ‘चोरीचा मामला’ आता पाच भाषांमध्ये; प्रियदर्शन जाधवने व्यक्त केला आनंद
2 सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरण : ‘आम्हाला कमी समजू नकोस’, अंकिताचं शिबानीला प्रत्युत्तर
3 रिया, शोविकच्या जामीन अर्जावर आज निर्णय
Just Now!
X