अभिनेत्री दीपिका पदुकोण आपल्या आगामी ‘xxx’ या हॉलीवूडपटाच्या चित्रीकरणासाठी कॅनडाला रवाना झाल्याचे समजते.

दीपिकाचा कथित प्रियकर आणि अभिनेता रणवीर सिंगने नवी दिल्ली येथे एका पुरस्कार सोहळ्यात दिपीका एका हॉलीवूड चित्रपटाच्या चित्रिकरणासाठी कॅनडाला जात असल्याची माहिती दिली.
सूत्रांकडुन मिळालेल्या माहिती नुसार दीपिका चित्रपटाच्या चित्रिकरणासाठी कॅनडाला रवाना झाली असून एक-दोन दिवसात चित्रिकरणाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. परंतु चित्रिकरणाचे निश्चित स्थान अद्याप कळू शकलेले नाही.
दीपिकाने या चित्रपटासाठी जिममध्ये खुप मेहनत घेतली असून, तीने  काही छायाचित्रे आणि व्हिडिओ शेअर केले आहेत.