20 September 2019

News Flash

चाहतीच्या फॅशनसमोर फिकं पडलं दीपिकाचं सौंदर्य

हा फोटो पाहून नक्की सेलिब्रिटी कोण असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.

छायासौजन्य- इन्स्टाग्राम

सेलिब्रिटी व त्यांचं फॅशन हा नेहमीच चर्चेचा विषय ठरला आहे. म्हणूनच एअरपोर्ट लूक, जिम लूक, पार्टी लूक यासाठी प्रत्येक सेलिब्रिटी विशेष मेहनत घेताना दिसतो. बॉलिवूडची ‘मस्तानी’ अर्थात अभिनेत्री दीपिका पदूकोणसुद्धा तिच्या स्टाइल स्टेटमेंटसाठी प्रसिद्ध आहे. मात्र सोशल मीडियावरील एका फोटोने दीपिकाच्या फॅशनला टक्कर दिला आहे. दीपिका सध्या लंडनमध्ये असून तिथल्या एका चाहतीने तिच्यासोबत फोटो काढून सोशल मीडियावर पोस्ट केला. हा फोटो पाहून नक्की सेलिब्रिटी कोण असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.

या फोटोमध्ये दीपिकाने गडद पिवळ्या रंगाची कार्गो पँट आणि त्यावर त्याची रंगाचा जॅकेट परिधान केल्याचं दिसतंय. तिच्यासोबत उभी असलेल्या चाहतीने राखाडी रंगाची पँट आणि त्यावर पांढरा टी-शर्ट परिधान केला असून त्यावर काळ्या रंगाचा जॅकेट घेतला आहे. चाहतीचे कपडे आणि तिचा लूक नेटकऱ्यांना इतका आवडला की तिच्यासमोर दीपिकाचं सौंदर्य फिकं पडल्याची प्रतिक्रिया अनेकांनी दिली आहे.

आणखी वाचा : इलियाना डिक्रूझचं ब्रेकअप? सोशल मीडियावर केलं एकमेकांना अनफॉलो

दीपिका सध्या तिच्या ‘छपाक’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. त्यानंतर ती ‘८३’ या चित्रपटामध्ये काम करणार आहे. या चित्रपटात लग्नानंतर पहिल्यांदाच ती पती रणवीर सिंगसोबत झळकणार आहे. विशेष म्हणजे दीपिका रणवीरची ऑनस्क्रीन पत्नी साकारणार आहे. त्यामुळे चाहत्यांना या चित्रपटाची फार उत्सुकता आहे.

First Published on August 26, 2019 1:59 pm

Web Title: deepika padukone picture with fan trolled on internet asking who is the celebrity ssv 92