19 November 2019

News Flash

दीपिका साकारणार अॅसिड हल्ल्यातून बचावलेल्या लक्ष्मी अगरवालची भूमिका

लग्नाला नकार दिल्यानंतर बहिणीच्या भावानं अॅसिड फेकून लक्ष्मीचा चेहरा विद्रुप केला होता. त्यावेळी तिचं वय १६ वर्ष होतं.

दीपिका तिच्या आगामी चित्रपटात अॅसिड हल्ल्यातून बचावलेल्या लक्ष्मी अगरवालची भूमिका साकारणार आहे.

‘पिकू’, ‘रामलीला’, ‘बाजीराव मस्तानी’, ‘पद्मावत’ यांसारख्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये यशाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचलेली अभिनेत्री दीपिका पादुकोन लवकरच एका वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांना दिसणार आहे. दीपिका तिच्या आगामी चित्रपटात अॅसिड हल्ल्यातून बचावलेल्या लक्ष्मी अगरवालची भूमिका साकारणार आहे. मेघना गुलजार या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहे. याच महिन्यात मेघना यांनी लक्ष्मी अगरवालवर चित्रपट तयार करण्याचा मानस बोलून दाखवला होता. विशेष म्हणजे स्वत: दीपिका या चित्रपटाची निर्मिती करणार आहे.

दिल्लीच्या गरीब कुटुंबातील लक्ष्मीला तिच्या मैत्रिणीच्या भावाने (वय ३२) मागणी घातली, तेव्हा तिचे वय होते १६ सुरू. तिचा नकार मिळाल्यावर त्याने अ‍ॅसिड फेकून तिचा चेहरा विद्रूप केला.. ही घटना २२ एप्रिल २००५ सालची. तेव्हापासून वयाच्या पंचविशीपर्यंत तिने फक्त अ‍ॅसिडहल्ल्याशी झुंज दिली. स्वत:चा चेहरा कसा वितळत होता आणि त्यावर चार शस्त्रक्रिया कराव्या लागल्या, याच्या कटू आठवणी लक्ष्मीकडे आहेत; पण त्याहीपेक्षा हे घडवणाऱ्यांना शिक्षा व्हावी, यासाठी तिने केलेले प्रयत्न तिला महत्त्वाचे वाटतात. तिची ती मैत्रीण- तिचा भाऊ आणि या कामी मदत करणारा त्याचा मित्र या तिघांनाही शिक्षा झाल्यावर स्वस्थ न बसता २००६ सालीच तिने जनहित याचिकेद्वारे अ‍ॅसिडहल्ला पीडितांसाठी विशेष कायदे असावेत, अंगावर अ‍ॅसिड फेकण्याचा उल्लेख असलेले कलम सध्याच्या फौजदारी कायद्यात आणि दंडसंहितेत असावे यासाठी आवश्यक दुरुस्त्या कराव्यात, अशा मागण्या न्यायपीठापुढे मांडल्या. अखेर चक्रे फिरली, मार्च २०१३ मध्ये केंद्र सरकारने कायदा आणला.

२०१४ मध्ये लक्ष्मीला ‘इंटरनॅशल विमेन ऑफ करेज अवॉर्ड’नं सन्मानित करण्यात आलं. आता लक्ष्मी अॅसिड हल्ल्यातील पिडीतांसाठी काम करत आहे. फेब्रुवारी २०१९ मध्ये या चित्रपटाच्या चित्रिकरणाला सुरूवात होणार आहे.

First Published on October 5, 2018 9:45 am

Web Title: deepika padukone play acid attack survivor laxmi agarwal in a film directed by meghna gulzar
टॅग Deepika Padukone
Just Now!
X