News Flash

दीपिका पदूकोणकडे ‘गोड बातमी’? लाईव्ह चॅटवरील त्या कमेंटमूळे प्रेक्षक संभ्रमात

रणवीरने चाहत्यांशी गप्पा मारण्यासाठी लाईव्ह चॅट सुरु केले होते

बॉलिवूडची मस्तानी दीपिका पदूकोण आणि अभिनेता रणवीर सिंग सोशल मीडियावर सतत सक्रिय असतात. दीपिका आणि रणवीर त्यांचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांची मने जिंकतात. तर कधी कधी हे दोघे ऐकमेकांच्या फोटोंवर कमेंट करताना दिसतात. नुकताच रणवीरच्या लाईव्ह चॅटवर दीपिकाने केलेल्या कमेंटवरून दीपिकाच्या प्रेग्नंसीच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

रणवीरने चाहत्यांशी गप्पा मारण्यासाठी लाईव्ह चॅट सुरु केले होते. दरम्यान अनेक चाहत्यांनी या चॅटद्वारे रणवीरशी गप्पा मारल्या. परंतु या सर्व कमेंटमध्ये दीपिकाने केलेल्या कमेंटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. दीपिकाने ‘हाय डॅडी’ अशी कमेंट केली. तिच्या या कमेंटवरुन दीपिका प्रेग्नंट असल्याच्या चर्चांना उधाण मिळाले आहे. दीपिकाने अद्याप या चर्चांवर तिचे मत व्यक्त केलेले नाही.

सध्या दीपिका तिचा आगमी चित्रपट ‘छपाक’मध्ये व्यग्र आहे. त्यानंतर दीपिका आणि रणवीर ’83’ चित्रपटामध्ये एकत्र काम करणार आहेत. या चित्रपटात भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांच्या पत्नीच्या भूमिकेत दीपिका झळकणार आहे. लंडनमधील लॉर्ड्सच्या मैदानावर २५ जून १९८३ रोजी भारतीय संघाने क्रिकेट विश्वचषक जिंकला होता याच विजयगाथेवर आधारित हा चित्रपट आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 17, 2019 2:59 pm

Web Title: deepika padukone pregnancy gossip started from ranveer singh live chat avb 95
Next Stories
1 पैसे नाही तर सचिन पिळगावकरांना ‘शोले’साठी मिळालं होतं हे गिफ्ट
2 जगभरात गाजलेल्या पनामा पेपर लिक प्रकरणावर येणार ‘नेटफ्लिक्स’वर सिनेमा
3 बॉलिवूडचा ‘हा’ अभिनेता ठरला जगातील सर्वात हॅन्डसम मॅन
Just Now!
X