05 March 2021

News Flash

दीपिकाच्या हातून गेला पी.व्ही. सिंधूचा बायोपिक, ही अभिनेत्री साकारणार भूमिका?

पी.व्ही. सिंधूच्या बायोपिकसाठी दीपिका पादुकोण जोरदार तयारी करत होती.

बॉलिवूड सिनेसृष्टीत सध्या बायोपिक चित्रपटांचे वारे वाहत आहेत. गेल्या वर्षभरात प्रदर्शित झालेल्या मणिकर्णिका, संजू, गोल्ड यांसारख्या चरित्रपटांच्या दमदार यशानंतर आता आणखीन दोन बायोपिक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. गमतीशीर बाब म्हणजे हे दोन्ही चित्रपट भारताच्या आघाडीच्या बाडमिंटनपटू सायना नेहवाल व पि.व्ही. सिंधूच्या कारकिर्दीवर आधारीत आहेत.

भारताची फुलराणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सायना नेहवालवरील चित्रपटात अभिनेत्री परिणाती चोप्रा झळकणार आहे. मात्र, पी.व्ही. सिंधूची भूमिका कोण साकारणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पी.व्ही. सिंधूच्या बायोपिकसाठी अभिनेत्री दीपिका पादुकोण जोरदार तयारी करत असल्याच्या चर्चा गेल्या वर्षभर सुरु होत्या. परंतु या चित्रपटासाठी आता आणखीन एका नवीन अभिनेत्रीचे नाव पुढे येत आहे. या चित्रपटात दीपिकाच्या जागी दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा अक्कीनेनी हिची वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आजवर थेरी, कथ्थी, ईगा, रंगस्थलम यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनयाचे प्रदर्शन करणारी समंथा दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. चर्चेत असलेल्या समंथाची देहबोली पी.व्ही सिंधूशी मिळतीजुळती आहे त्यामुळे दीपिका पादुकोणच्या जागी समंथा योग्य ठरेल असे तिच्या चाहत्यांचे मत आहे. समंथा सध्या बी.व्ही. रेड्डी दिग्दर्शित ‘ओ बेबी’ या तेलुगु चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. त्यामुळे तिने पी.व्ही. सिंधूवरील चित्रपटाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. परंतु चाहते मात्र समंथाचे बॉलिवूडमधील पदार्पण पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 4, 2019 2:17 pm

Web Title: deepika padukone pv sindhu biopic samantha akkineni mppg 94
Next Stories
1 Photo : कल्की कोचलीन दुसऱ्यांदा संसार थाटण्यास सज्ज?
2 मादाम तुसाँ संग्रहालयात श्रीदेवींचा मेणाचा पुतळा, पाहा व्हिडीओ
3 हिंदू आहेस की मुस्लीम? गणेशोत्सवावरून सारा अली खानला कट्टरपंथीयांचा सवाल
Just Now!
X