दीपिका रणवीर या दोघांनीही आपल्या लग्नातले फोटो कुठेही लीक होणार नाही याची पुरेपुर काळजी घेतली. लग्नाला अवघे काही तास उरले असतानाही अद्यापही त्यांचे फोटो समोर आले नाही. इटलीत पार पडणाऱ्या या समारंभातला एकही फोटो सोशल मीडियावर अपलोड होणार नाही ही अट दोघांनीही कुटुंबीय आणि पाहुण्यांपुढे ठेवली होती. मात्र उत्साहाच्या भरात गायिका हर्षदीप कौरने तिचा फोटो सोशल मीडियावर अपलोड केला.

हर्षदीपला संगीत कार्यक्रमात गाण्याचं खास आमंत्रण दोन्ही परिवाराकडून देण्यात आलं होतं. लग्नाच्या आदल्या दिवशी पार पडलेल्या संगीत कार्यक्रमात हर्षदीपनं सर्वांनाच आपल्या आवाजानं मुग्ध केलं. तिनं काही तासांपूर्वीच लेक कोमो परिसरातील आपला फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर अपलोड केला होता. मात्र दीप वीरनं तिला हा फोटो सोशल मीडिया अकाऊंटवरून काढून टाकण्याची विनंती केली आहे. त्यामुळे हर्षदीपनं तातडीनं हा फोटो डिलीट केला आहे.

तर दुसरीकडे पाहुण्यांनी मोबाइलमध्ये फोटो टिपून ते सोशल मीडियावर अपलोड करु नये म्हणून मोबाइलचा कॅमेरा झाकण्यासाठी त्यावर स्टिकर्स लावण्यात आल्याचंही समजत आहे. येथे ड्रोन वापरण्यासही पूर्णपणे बंदी घालण्यात आली असून लेक कोमो परिसरात सुरक्षारक्षकांच्या बोटींच्या गस्तीही वाढवण्यात आल्या आहेत. थोड्याच वेळात पारंपरिक कोंकणी पद्धीतनं दीपिका- वीर विवाहबंधनात अडकणार आहे.