26 June 2019

News Flash

ठरलं तर ! ’83’ मध्ये एकत्र झळकणार दीप-वीर

‘पद्मावत’नंतर आता पुन्हा एकदा ही बहुचर्चित जोडी एकत्र झळकणार असल्याचं कळतंय.

दीपिका पदुकोण,रणवीर सिंग

अभिनेता रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांना ऑनस्क्रीन एकत्र पाहण्याची चाहत्यांची फार इच्छा आहे. आता ही इच्छा पूर्ण होणार आहे. ‘रामलीला’, ‘बाजीराव मस्तानी’ आणि ‘पद्मावत’नंतर आता पुन्हा एकदा ही बहुचर्चित जोडी एकत्र झळकणार असल्याचं कळतंय. ’83’ चित्रपटात भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांच्या पत्नीच्या भूमिकेत दीपिका झळकणार आहे.

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने केलेल्या ट्विटनुसार, ‘दीपिका पदुकोण आगामी ’83’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात रणवीर कपिल देव यांची भूमिका साकारणार आहे. दीपिका कपिल देव यांची पत्नी ‘रोमी देव’ यांची भूमिका साकारणार आहे. कबीर खान दिग्दर्शित हा चित्रपट १० एप्रिल २०२० रोजी प्रदर्शित होणार आहे.’

लंडनमधील लॉर्ड्सच्या मैदानावर २५ जून १९८३ रोजी भारतीय संघाने क्रिकेट विश्वचषक जिंकला होता. याच विजयगाथेवर आधारित ’83’ हा चित्रपट  १० एप्रिल २०२० रोजी प्रदर्शित होणार आहे. ‘83 ’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा चित्रपट दिग्दर्शक कबीर खान सांभाळत आहे. चित्रपटाच्या टीममध्ये रणवीर सिंग, एमी विर्क,चिराग पाटील ,साकीब सलीम ,ताहिर भसीन ,जतिन सरना ,जीवा, आदिनाथ कोठारे, साहिल खट्टर,पंकज त्रिपाठी हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.

First Published on June 12, 2019 11:09 am

Web Title: deepika padukone ranveer singh 83 kapil dev djj 97