21 November 2019

News Flash

दीपिकाच्या ’83’मधील भूमिकेमुळे रणवीरला का मिळाला दिलासा?

आतापर्यंत दीपिका व रणवीरने तीन चित्रपट एकत्र केले आहेत. कोणात्याही चित्रपटात त्यांचे आनंदाने मिलन झालेले नाही.

दीपिका पदुकोण,रणवीर सिंग

अभिनेता रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांना ऑनस्क्रीन एकत्र पाहण्याची चाहत्यांची फार इच्छा आहे. आता ही इच्छा पूर्ण होणार आहे. ‘रामलीला’, ‘बाजीराव मस्तानी’ आणि ‘पद्मावत’नंतर आता पुन्हा एकदा ही बहुचर्चित जोडी ’83’ या चित्रपटातून पुन्हा एकडा रुपेरी पडद्यावर येतेय. ’83’ चित्रपटात भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांच्या पत्नीच्या भूमिकेत दीपिका झळकणार आहे.

आतापर्यंत दीपिका व रणवीरने तीन चित्रपट एकत्र केले आहेत. हे तिन्ही चित्रपट संजय लीला भन्साळी यांचे असून या चित्रपटांचा शेवट दुःखद आहे. कोणात्याही चित्रपटात त्यांचे आनंदाने मिलन झालेले नाही. ‘बाजीराव मस्तानी’मध्ये त्या दोघांचाही अंत होतो तर ‘पद्मावत’मध्ये खिल्जीपासून वाचण्यासाठी दीपिका जौहर करते. ‘राम लीला’ चित्रपटात ते दोघंही एकमेकांना मारतात. पण आता, ’83’मध्ये ते आनंदाने एकत्र राहणार आहेत. या चित्रपटात रणवीर कपिल देव यांचा तर दीपिका कपिल देव यांची पत्नी ‘रोमी देव’ यांची भूमिका साकारणार आहे.

दीपिकाने या बातमीची घोषणा करताना तिच्या इंस्टाग्राम खात्यावरून फोटो शेअर केला आहे. ज्यावर रणवीरने न राहवून कमेंट केली आहे. त्याने हसून असे म्हटले आहे की, ‘निदान या चित्रपटाच्या शेवटी तरी आपण मरणार नाही.’

लंडनमधील लॉर्ड्सच्या मैदानावर २५ जून १९८३ रोजी भारतीय संघाने क्रिकेट विश्वचषक जिंकला होता. याच विजयगाथेवर आधारित ’83’ हा चित्रपट १० एप्रिल २०२० रोजी प्रदर्शित होणार आहे.  ‘83 ’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा चित्रपट दिग्दर्शक कबीर खान सांभाळत आहे. चित्रपटाच्या टीममध्ये रणवीर सिंग, एमी विर्क,चिराग पाटील ,साकीब सलीम ,ताहिर भसीन ,जतिन सरना ,जीवा, आदिनाथ कोठारे, साहिल खट्टर,पंकज त्रिपाठी हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.

First Published on June 12, 2019 7:17 pm

Web Title: deepika padukone ranveer singh instagram djj 97
Just Now!
X