बॉलिवूडमधला विवाह सोहळा म्हटलं तर खर्च हा होणारच. त्यातून डेस्टिनेशन वेडिंग म्हणलं की खर्चाच हिशेब कधी करायचाच नसतो असं म्हणतात. सध्या इटलीतल्या नयनरम्य परिसरात बॉलिवूडमधला सर्वात मोठा विवाह सोहळा संपन्न होत आहे. या ग्रँड वेडिंगसाठी सगळंच काही ग्रँड असणार हे नक्की. या विवाहसोहळ्यासाठी दीपिका रणवीरनं कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. १४ नोव्हेंबरला कोंकणी पद्धतीनं विवाह पार पडल्यानंतर दीपिका आणि रणवीर कास्टादिवा रिसॉर्टमध्ये परतले. यावेळी लेक कोमोच्या किनाऱ्यावर वसलेल्या रिसॉर्टमध्ये परतण्यासाठी खास विंटेज बोटीची सोय करण्यात आली होती.

या बोटची किंमतच साधरण चार कोटींहून अधिक असल्याचं समजत आहे. व्हिला ते रिसॉर्टमधला प्रवास दीप-वीरनं याच आलिशान बोटीतून केला. इटालीयन पद्धतीची ही आलिशन बोट अद्यावत सोयी सुविधांनी युक्त अशी होती. कोंकणी पद्धतीनं लग्न पार पडल्यानंतर दीपिका रणवीर हे दोघंही पुन्हा एकदा सिंधी पद्धतीनं लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. आज पार पडणाऱ्या या लग्नसोहळ्यात नवरदेव रणवीर सी- प्लेनमधून ग्रँड फिल्मी एण्ट्री करणार असल्याची माहिती समोर येत आहे.

दीपिका आणि रणवीर यांच्या लग्नाच्या पार्श्वभूमीवर येथे कडेकोट सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली आहे. मात्र या दोघांच्या लग्नाचा एकही फोटो अद्यापही समोर आलेला नाही. चाहते या दोघांचेही फोटो पाहायला उत्सुक आहेत.