दीपिका पादुकोन आणि रणवीर सिंग हे दोघंही विवाहबंधनात अडकले आहे. मात्र आपल्या लग्नातले फोटो कुठेही लीक होणार नाही याची काळजी या दोघांनीही शेवटच्या क्षणापर्यंत घेतली आहे. त्या दोघांचे फोटो पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. मात्र हे फोटो पाहण्यासाठी चाहत्यांना आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार असं दिसतंय.

आधी फोटो डिलीट कर, दीप-वीरच्या विनंतीवरुन गायिकेनं काढून टाकला फोटो

केवळ छायाचित्रकरांनी काढलेले फोटो सोशल मीडियावर जावे अशी दोघांची इच्छा आहे. म्हणून लग्नात आलेल्या प्रमुख पाहुण्यांपुढे मोबाइलमध्ये फोटो न काढण्याची अट दोघांनी ठेवली. या अटीची कडक अंमलबजावणी करण्यात आली आहे. सुत्रांच्या माहितीनुसार विवाहस्थळी उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या कॅमेरासमोर स्टिकर्स लावण्यात आले आहे. यामुळे कोणालाही मोबाईलमध्ये फोटो टिपता येणार नाही. लवकरच अधिकृत छायाचित्रांकडून टिपलेले फोटो समोर येतील तोपर्यंत चाहत्यांना प्रतीक्षा करावी लागणार हे नक्की!

व्हिला दी बाल्बिआनेलोमध्ये दीप वीरचा विवाहसोहळा संपन्न झाला. १५ नोव्हेंबरला हे दोघंही सिंधी पद्धतीनं पुन्हा लग्न करणार आहे. तर २८ नोव्हेंबरला या दोघांनी मुंबईत रिसेप्शन पार्टीचं आयोजन केलं आहे.