News Flash

Video : दीपिकाने सांगितलं बेडरूम सिक्रेट, म्हणाली “रणवीर रात्री…”

तिचं हे उत्तर ऐकताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

रणवीर- दीपिका

बॉलिवूडमध्ये सर्वाधिक चर्चेत असलेली जोडी म्हणजे अभिनेता रणवीर सिंग व दीपिका पदुकोण. या दोघांची ऑफस्क्रीन व ऑनस्क्रीन केमिस्ट्री नेहमीच चाहत्यांचं लक्ष वेधून घेते. सध्या सोशल मीडियावर दीपिकाचा एका पुरस्कार सोहळ्यातील व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. या पुरस्कार सोहळ्यात स्टेजवर दीपिका रणवीरबद्दलच्या काही खास गोष्टी श्रोत्यांना सांगताना दिसतेय.

‘फेमिना ब्युटी अवॉर्ड्स’मध्ये तिने हजेरी लावली होती. याच कार्यक्रमादरम्यान तिने रणवीरच्या काही सवयींचा खुलासा केला. कार्यक्रमात बोलताना दीपिकाने बेडरुम सिक्रेटसुद्धा सांगितलं. खरंतर दीपिकाला रणवीरच्या ब्युटी सिक्रेटबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाचं उत्तर देताना दीपिका म्हणाली, “रणवीर अंघोळीला खूप जास्त वेळ घेतो आणि टॉयलेटमध्येही तो बराच वेळ असतो. त्याला तयार व्हायला माझ्यापेक्षाही जास्त वेळ लागतो आणि अंथरुणात यायलाही तो फार वेळ लावतो.” तिचं हे उत्तर ऐकताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. त्यावर सावरून घेत ती पुढे म्हणते, “मला असं म्हणायचं होतं की तो अंथरुणात झोपायला फार वेळ लावतो.”

आणखी वाचा : उर्वशी रौतेलाने वाढवली फी; ‘व्हर्जिन भानुप्रिया’साठी घेतले तब्बल इतके कोटी रुपये

रणवीर-दीपिकाने सहा वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर १४ नोव्हेंबर २०१८ रोजी लग्नगाठ बांधली. इटलीमध्ये त्यांचा विवाहसोहळा पार पडला. सध्या लॉकडाउनमुळे हे दोघं घरीच असून दीपिकाने वर्क फ्रॉम होम सुरु केलं आहे. चित्रपटांचे स्क्रीप्ट वाचणे व त्यावर काम करणे, अशा गोष्टी ती घरी बसून करत आहे. तर रणवीरचा ‘८३’ हा चित्रपट प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 11, 2020 1:46 pm

Web Title: deepika padukone reveals bedroom secrets of ranveer singh ssv 92
Next Stories
1 अनुष्काच्या ‘बोल्ड’ लूकने काढली विराटची विकेट!
2 कंगनाने काळी जादू केली म्हणणारा अध्ययन सुमन आता करतोय तिचं कौतुक
3 पनवेलच्या फार्महाऊसवर सलमान लुटतोय पावसाचा आनंद; पाहा व्हिडीओ
Just Now!
X