News Flash

‘ती गोष्ट माझ्या तोंडावर बोलण्याची हिंमत फक्त रणबीरमध्येच’

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत दीपिकाने केला खुलासा

दीपिका पादुकोण, रणबीर कपूर, Deepika Padukone Ranbir Kapoor

‘पद्मावत’ या ब्लॉकबस्टर चित्रपटानंतर अभिनेत्री दीपिका पदुकोणने काही वेळासाठी ब्रेक घेतला आहे. एका फॅशन मॅगझिनसाठी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत दीपिकाने बऱ्याच गोष्टी मोकळेपणाने सांगितल्या. रणबीर कपूरविषयीच्या प्रश्नांची उत्तरंही तिनं स्पष्टपणे दिली. कोरिओग्राफर आणि दिग्दर्शक फराह खानने दीपिकाची ही मुलाखत घेतली होती.

तू फ्लर्ट करणारी किंवा इतरांची खिल्ली उडवणारी आहेस का, असा प्रश्न फराहने दीपिकाला विचारला होता. त्यावर अत्यंत मजेशीरपणे तिनं उत्तर दिलं. ‘मी फ्लर्ट करणारी किंवा खिल्ली उडवणारी आहे असं रणबीर कपूर म्हणतो. किंबहुना माझ्या तोंडावर असं म्हणण्याची हिंमत ठेवणारा तो पहिलाच व्यक्ती आहे,’ असं दीपिका म्हणाली. मी अत्यंत भावनिक असून या भावनांचं माझ्यावर राज्य असतं, असंही तिने पुढे सांगितलं.

वाचा : ‘तुर्रम खान’साठी राजकुमार राव- नुशरत भरुचा आले एकत्र

रणबीर कपूर आणि दीपिका यांचं नातं जगजाहिर आहे. पण हे नातं फार काळ टिकू शकलं नाही. आता रणबीरच्या आयुष्यात आलिया भट्ट तर दीपिकाच्या आयुष्यात रणवीर सिंग आहे. पण तरीही दोघांनी त्यांच्यातील मैत्री कायम ठेवली आहे. काही दिवसांपूर्वीच रणबीर- दीपिकाने एकत्र रॅम्पवॉक केला होता.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 10, 2018 2:09 pm

Web Title: deepika padukone reveals ex bf ranbir kapoor had the guts to say this on her face
Next Stories
1 The Nun box office collection Day 3: ‘स्त्री’ला टक्कर देतेय हॉलिवूडची ‘द नन’
2 अंशुला म्हणते, ही आहे बोनी कपूरची लाडकी लेक
3 Video : नोरा फतेहीच्या बेली डान्सला सुष्मिता सेन देतेय टक्कर
Just Now!
X