23 April 2019

News Flash

‘ईन्शाल्ला’, दीपिका-सलमान खान येणार एकत्र?

'ईन्शाल्ला' या चित्रपटातून ते दोघंही एकत्र पाहायला मिळणार आहे अशी चर्चा आहे.

दीपिका - सलमान खान

बॉलिवूडची सर्वात आघाडीची अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि बॉलिवूडचा दबंग भाईजान सलमान खान ही नवी जोडी संजय लिला भन्साली यांच्या ‘ईन्शाल्ला’ या चित्रपटातून दिसणार आहे. आतापर्यंत दीपिका आणि सलमाननं एकत्र काम केलं नाही, प्रियांका चोप्रानं ‘भारत’ सिनेमा सोडल्यानंतर मुख्य अभिनेत्री म्हणून दीपिकाच्या नावाचीही चर्चा होती मात्र काही कारणानं हे दोघंही एकत्र काम करण्याचा योग काही जुळून आला नाही.

अखेर ‘ईन्शाल्ला’ या चित्रपटातून ते दोघंही एकत्र पाहायला मिळणार आहे अशी चर्चा आहे. ‘हम दिल दे चुके सनम’ , ‘सावरियाँ’ या संजय लिला भन्साळींच्या चित्रपटातून सलमाननं काम केलं होतं. पण, नंतर भन्साळींसोबत काम करण्याचा योग काही जुळून आला नाही. अखेर ‘इंशाअल्लाह’ साठी सलमानची निवड केल्याच्या चर्चा आहे. तर या चित्रपटात दीपिका ही मुख्य अभिनेत्री असेल. ‘राम-लिला’, ‘पद्मावत’, ‘बाजीराव मस्तानी’ यांसारख्या चित्रपटातून दीपिकानं भन्साळींसोबत काम केलं आहे. विशेष म्हणजे या चित्रपटामुळे तिनं यशही मिळवून दिलंय. त्यामुळे भन्साळींच्या आगामी चित्रपटात दीपिका आणि सलमान ही जोडी पाहायला मिळणार अशी चर्चा आहे. तूर्त तरी भन्साळींनी या चित्रपटाविषयी कोणतीही अधिकृत घोषणा भन्साळी यांनी केलेली नाही.

First Published on August 10, 2018 7:05 pm

Web Title: deepika padukone salman khan in sanjay leela bhansali inshallah