करोना विषाणूचा प्रसार रोखता यावा यासाठी देशभरात २१ दिवस लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. सर्व शूटिंग रद्द झाले आहेत. सर्वसामान्यांप्रमाणेच सेलिब्रिटीसुद्धा घरीच बसले आहेत. अशा वेळी सोशल मीडियाद्वारे ते घरी बसून काय करत आहेत याचे फोटो, व्हिडीओ पोस्ट करताना दिसत आहेत. अभिनेत्री दीपिका पदुकोण व कतरिना कैफ यांनी तर इन्स्टाग्रामवर अशा व्हिडीओची एक मालिकाच सुरू केली आहे. दरदिवशी ते घरातलं कोणतं काम करतात, हे या व्हिडीओतून ते सांगत असतात. अशाच एका व्हिडीओवरून दीपिकाने कतरिनावर चोरीचा आरोप केला आहे.

एकीकडे दीपिका तिचा वॉर्डरोब साफ करताना, वर्कआऊट करताना, घरच्या घरीच आईस्क्रीम खाण्याचा आनंद लुटतानाचे फोटो पोस्ट करत आहे. तर दुसरीकडे कतरिना घरातील भांडी घासताना, झाडू मारतानाचे व्हिडीओ पोस्ट करत आहे. कतरिनाचा भांडी घासतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. तिचा हाच व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करत दीपिका म्हणाली, ‘पाचव्या दिवसाचा माझा फोटो मी पोस्ट करू शकत नाही. कारण कतरिनाने माझी कल्पना चोरली आहे.’ अर्थात तिने हे गमतीशीरपणे म्हटलं.

https://www.instagram.com/p/B-MzQeqjfo5/

आणखी वाचा : आमिरच्या लेकीची आगळीवेगळी इच्छा; अभिनेत्याला नव्हे अभिनेत्रीला करायचंय डेट

एकेकाळी दीपिका व कतरिना यांच्यात टोकाचे वाद होते. यामागचं कारण म्हणजे अभिनेता रणबीर कपूर. दीपिकाशी ब्रेकअप झाल्यानंतर रणबीर कतरिनाला डेट करू लागला होता. त्यामुळे दीपिका व कतरिना यांच्यात शीतयुद्ध सुरू होते.