News Flash

प्रेमाची नाती फार गुंतागुंतीची असतात- दीपिका पदुकोण

रिलेशनमध्ये असणारी जोडपी अनेक गोष्टी पचवू शकत नाहीत.

दीपिका पदुकोण

रिलेशनमध्ये असणारी जोडपी अनेक गोष्टी पचवू शकत नाहीत. त्यामुळेच नातेसंबंध सांभाळणे हे फार कठीण काम असल्याचे बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणचे म्हणणे आहे. दीपिका अनेक वर्षे रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती. पण काही कारणांमुळे त्यांचे नाते पुढे जाऊ शकले नाही. त्यानंतर सध्या दीपिका रणवीर सिंगसोबत रिलेशनमध्ये आहे.

हेमा मालिनी यांच्या आत्मचरित्राचे अनावरण करतान तिने कोणाचेही नाव न घेता आपले मत मांडले. दीपिका म्हणाली की, ‘नात्यात दुसऱ्याची बाजू समजून घेणारा जोडीदार शोधणे फार कठीण आहे. अशीही काही नाती असतात ज्यात लोकांना मुलगी जास्त कमावते ही गोष्टही सहन होत नाही. एवढेच नाही तर आम्ही प्रत्येक सिनेमात जीव तोडून मेहनत करतो जेणेकरुन पुढे आम्हाला काम मिळत राहील. यासाठीच चांगल्या दिग्दर्शकांसोबत काम करण्याचा आमचा प्रयत्न असतो. पण प्रेमसंबंधांमध्ये असे काही होत नाही. नात्यात असा माणूस मिळणे फार आवश्यक असते जो तुमची कमाई जास्त आहे म्हणून जळफळाट करत नाही. याशिवाय त्याने तुमचे यशही समजून घेतले पाहिजे.’

दीपिका नेहमीच आपल्या नात्याबद्दल सावध राहिली आहे. तिने अनेकदा सांगितले की तिच्या खासगी आयुष्यात जे काही सुरू असते त्याची वाच्यता ती सार्वजनिक ठिकाणी करत नाही. दीपिकाच्या आगामी सिनेमांबद्दल बोलायचे झाले तर १ डिसेंबरला संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावती’ हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात तिच्यासोबत शाहिद कपूर आणि रणवीर सिंग यांच्या मुख्य भूमिका आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 20, 2017 6:07 pm

Web Title: deepika padukone says love relationship are very complicated
Next Stories
1 करणच्याआधी आलियानेच शेअर केला रुही- यशचा फोटो
2 बॉलिवूडमध्येही लैंगिक छळ होतो- प्रियांका चोप्रा
3 ‘घाडगे & सून’ मालिकेमध्ये दिवाळीची धमाल
Just Now!
X