अभिनेत्री दीपिका पदुकोणने इन्स्टाग्रामवर तिचे काही जुने फोटो पोस्ट केले आहेत. शाळा, कॉलेजच्या दिवसांतील हे तिचे फोटो आहेत. मित्रमैत्रिणींसोबत बस आणि रेल्वेने प्रवास करतानाच्या आठवणी तिने चाहत्यांना सांगितल्या आहेत. या फोटोंसोबत तिने छान संदेशसुद्धा लिहिला आहे. ‘ते म्हणतात की पुढे पाहा.. पण कधी कधी मागे वळून पाहणं, आपण कुठून आलो आहोत आणि आता कुठे आहोत याचा अभूतपूर्व प्रवास आठवणं चांगलं असतं’, असं तिने फोटोच्या कॅप्शनमध्ये म्हटलंय.

मॉडेलिंगपासून करिअरची सुरुवात करणाऱ्या दीपिकाने आता बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये स्थान मिळवलंय. हे फोटो पाहून कदाचित तिला एक सामान्य मुलगी ते प्रसिद्ध अभिनेत्री होण्यापर्यंतचा प्रवास आठवला असावा. दीपिकाचा हा प्रवास इतरांसाठीही प्रेरणादायी आहे.

https://www.instagram.com/p/CCdJ1u_DJTy/

आणखी वाचा : मेकअप करतोय की दिवाळीचा फटाका लावतोय?; कुशल बद्रिकेला पडला प्रश्न

दीपिकाने वयाच्या १७व्या वर्षी ग्लॅमरच्या दुनियेत पाऊल ठेवलं. पदार्पणातच ‘ओम शांती ओम’ या चित्रपटात दुहेरी भूमिका साकारणा-या दीपिकाला चित्रपटसृष्टीने सहजासहजी स्वीकारले नाही. दाक्षिणात्य उच्चार आणि अभिनयाचा अभाव यामुळे तिला चित्रपटसृष्टीत नाव कमाविण्यासाठी परिश्रम करावे लागले. काही खराब चित्रपट आणि चुकीच्या निर्णयानंतर २००९ साली तिला अखेर चांगला ब्रेक मिळाला. सैफ अली खानसोबतच्या ‘लव्ह आज कल’ चित्रपटातील तिच्या कामाची वाहवा झाली. त्यानंतर आजवर तिने मागे वळून पाहिलेले नाही.