बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटो आणि व्हिडीओजच्या माध्यमातून ती कायम असते. यावेळी ती व्हायरल होणाऱ्या तिच्या मिम्समुळे चर्चेत आहे. दीपिकानं चाहत्यांना आपल्या अनोख्या शैलीत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिने शुभेच्छा देण्यासाठी स्वत:चे आणि पती रणवीरचे मिम्स शेअर केले आहेत. हे गमंतीशीर मिम्स सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.
अवश्य पाहा – ‘राजा हिंदुस्तानी’मधील किसिंग सीन कसा केला शूट? दिग्दर्शकाने सांगितला अजब किस्सा
अवश्य पाहा – ‘ढिल्या कपड्यांमुळे मारली होती थोबाडीत’; करिश्माने घटस्फोटित पतीवर केला आरोप
अवश्य पाहा – सोज्वळ सुनेचा ग्लॅमरस अवतार; अभिनेत्रीच्या हॉट फोटोशूटमुळे चाहते आवाक्
लहानांपासून मोठय़ांपर्यंत सर्वानाच आतुरता असते तो सण म्हणजे दिवाळी. फटाक्यांची आतषबाजी, नवीन पोशाखात सुहृद आणि मित्रमंडळींच्या गाठीभेटी घेत, शुभेच्छांचे आदानप्रदान करत दिवाळी पहाटसारख्या संगीत मैफलींना हजेरी लावून होणाऱ्या दिवाळसणाच्या नांदीचा कित्येक वर्षांचा हा शिरस्ता यंदा करोनामुळे मोडला गेला. करोनामुळे दरवर्षीचे कार्यक्रम व गाठीभेटी होणार नसल्या तरी उत्साह मात्र कुठेही कमी झालेला जाणवत नाही. अनेक तरुणांनी टाळेबंदीचा फायदा घेत दिवाळीत आवश्यक असलेल्या वस्तूंमध्ये कल्पकता आणली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 16, 2020 4:56 pm