18 February 2019

News Flash

दीपिकाच्या वर्कआऊटचा ‘हा’ फोटो होतोय व्हायरल

या फोटोला आतापर्यंत प्रचंड लाईक्स मिळाले असून हा फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे.

दीपिका पदुकोण

बॉलिवूडमधली सर्वात ग्रेसफुल अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी दीपिका पदुकोण सध्या लग्नाच्या तयारीला लागल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र लग्नाच्या धामधुमीमध्येही तीने  फिटनेसकडे जराही दुर्लक्ष केलेले नाही. फिटनेसबाबत सतर्क असलेल्या दीपिकाने नुकताच योगा करतानाचा फोटो शेअर केला आहे. या फोटोला आतापर्यंत प्रचंड लाईक्स मिळाले असून हा फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे.

सोशल मीडियावर कायम अॅक्टीव्ह असलेली दीपिका तिच्या फिटनेसकडे सातत्याने लक्ष देत असते. कितीही व्यस्त शेड्युल असलं तरी दीपिका न चुकता योगा आणि वर्कआऊट करताना दिसते. विशेष म्हणजे योगा किंवा वर्कआऊट करताना एखादा नवीन प्रकार शिकल्यानंतर त्याचे फोटो, व्हिडिओ दीपिका   इन्स्टाग्रामच्या माध्यमातून शेअर करत असते. त्यामुळे तिने सध्या योगासन करतानाचा एक फोटो शेअप केला आहे.

upside down,inside out!!!

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

शेअर केलेल्या फोटोमध्ये दीपिका शीर्षासन करत असून तिने त्याला ‘अप साईड डाऊन, इनसाईड आऊट’ असं कॅप्शन दिलं आहे. या फोटोमध्ये दीपिकाने काळ्या रंगाचे कपडे घातले आहेत. दीपिकाने हा फोटो शेअर केल्यानंतर त्याच्यावर काही काळात लाईक्सचा पाऊस पडायला लागला असून बघता बघता हा फोटो वाऱ्यासारखा व्हायरल झाला आहे.

 

First Published on July 12, 2018 9:50 am

Web Title: deepika padukone shares fitness photo