News Flash

‘टिक टॉक’च्या व्हिडीओवरून कंगनाने घेतला दीपिकाशी पंगा, म्हणाली…

दीपिका सोशल मीडियावरही ट्रोल होत आहे

सत्यघटनेवर आधारित ‘छपाक’ हा चित्रपट अलिकडेच प्रदर्शित झाला. अॅसिड हल्ल्यातून बचावलेल्या लक्ष्मी अगरवाल हिच्या जीवनावर आधारित या चित्रपटात दीपिका पदुकोणने मुख्य भूमिका साकारली आहे. या चित्रपटात तिने केलेल्या अभिनयामुळे तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत होता. परंतु तिच्या एका चुकीमुळे गेल्या काही दिवसांपासून ती सोशल मीडियावर चांगलीच ट्रोल होतीये. या साऱ्यामध्ये आता अभिनेत्री कंगना रणौतनेदेखील उडी घेतली आहे.

‘छपाक’चं प्रमोशन करण्यासाठी दीपिका आणि टिक टॉक स्टार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फाबीने एक व्हिडीओ तयार केला. या व्हिडीओमध्ये दीपिकाने फाबीला तिच्या आवडीच्या तीन चित्रपटांमधील लूक्स रिक्रिएट करण्याचं चॅलेंज दिलं. यामध्ये ‘छपाक’ चादेखील समावेश होता. ‘छपाक’मधील दीपिकाचा लूक फाबीला रिक्रिएट करायचा होता. मात्र हे चॅलेंज नेटकऱ्यांना फारसं पटलं नाही. यात ‘छपाक’मधील लूक रिक्रिएट करण्यास सांगितल्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली. त्यातच आता कंगनानेदेखील दीपिकाला जाहीरपणे माफी मागण्यास सांगितलं आहे. एका मुलाखतीमध्ये कंगना बोलत होती.

“दीपिकाने केलेला व्हिडीओ हा अत्यंत असंवेदनशील आहे, त्यामुळे तिने माफी मागायला हवी. माझी बहिण अॅसिड हल्ल्याची पीडिता आहे आणि हा व्हिडीओ पाहून तिला खूप त्रास झाला. तिच्याप्रमाणेच अशा अनेक पीडितांना त्रास झाला असेल, त्यामुळे दीपिकाने माफी मागावी”, असं कंगनाने म्हटलं.

आणखी वाचा : Video: ‘तुला लाज वाटली पाहिजे’; टिक टॉक व्हिडीओ केल्यामुळे दीपिका ट्रोल

पुढे ती म्हणते, “बऱ्याच वेळा मार्केटिंग टीम प्रमोशनसाठी अशा युक्त्या लढवत असतात आणि तुम्हाला न पटलेल्या गोष्टीदेखील यावेळी कराव्या लागतात. अॅसिड हल्ल्यातनंतर विद्रुप झालेला चेहरा हा कोणत्याही मेकअपचा विषय होऊ शकत नाही.त्यामुळे दीपिकाने माफी मागावी. कारण चुका माणसांकडूनच होत असतात”.

आणखी वाचा : Video : छपाकमुळे ‘त्या’ नराधमांना चांगली चपराक बसेल – कंगना रणौत

दरम्यान, काही दिवसांपूर्वी कंगनाने चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर दीपिका आणि दिग्दर्शिका मेघना गुलजार यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला होता. या चित्रपटाच्या माध्यमातून त्या साऱ्या नराधमांना चपराक बसणार आहे ज्यांनी महिलांसोबत असं कृत्य करण्याची हिंमत केली”, असं त्यावेळी कंगना म्हणाली होती. त्यामुळेच यावेळी मात्र कंगनाने दीपिकाला तिची चूक दाखवून देत माफी मागण्याचा सल्ला दिला आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 21, 2020 9:05 am

Web Title: deepika padukone should apologize for her tik tok video on chhapaak look says kangana ranaut ssj 93
Next Stories
1 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अजय देवगणसोबत पाहणार ‘तान्हाजी’
2 आयुषमान खुरानाने आणली समलिंगी लव्हस्टोरी
3 “मला बायल्या चिडवायचे, टॉयलेटला गेल्यानंतर मागे यायचे”, प्रणितने सांगितला गंगापर्यंतचा खडतर प्रवास
Just Now!
X