सध्या बॉलिवूडची मस्तानी अभिनेत्री दीपिका पदूकोण तिचा आगमी चित्रपट ‘छपाक’च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. याच दरम्यान तिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती अॅसिड हल्ल्यातून बचावलेल्या मालतीच्या रुपात बाजारात फिरताना दिसत आहे.
दीपिकाने हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. अॅसिड हल्ल्यातून बचावल्यानंतर एखाद्या मुलीकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टीकोन या व्हिडीओमध्ये दाखवण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये दीपिका इतर अॅसिड विक्टिमसोबत बाजारात फिरताना दिसत आहे. काही लोकं एखाद्या सामान्य व्यक्तीप्रमाणे हसत, खेळत दीपिकाशी बोलताना दिसत आहेत तर काहींनी तिच्याशी बोलणे टाळले आहे.
या प्रयोगासाठी दीपिकाने अॅसिड हल्ल्यातून बचावलेल्या मालतीसारखा मेकअप केला आहे. त्यामुळे तिला फिरताना कोणीही ओळखू शकले नाही. व्हिडीओच्या शेवटी दीपिका लोकांना एखाद्या व्यक्तीकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलण्याचे आवाहन करत आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 7, 2020 6:16 pm