News Flash

…म्हणून दीपिकाने घेतला अभिनेत्री होण्याचा निर्णय

एका मुलाखतीदरम्यान दीपिकाने याचा खुलासा केला आहे

बॉलिवूडची मस्तानी अभिनेत्री दीपिका पदूकोण सध्या बॉलिवूडमधील टॉप यादीतील अभिनेत्री आहे. या यादीमध्ये स्थान पटकावण्यासाठी दीपिकाला प्रचंड मेहनत घ्यावी लागली. एका मुलाखतीदरम्यान दीपकाने अभिनेत्री होण्याचा निर्णय कसा घेतला याचा खुलासा केला आहे.

नुकताच झालेल्या एका मुलाखतीमध्ये दीपिकाला अभिनयाच्या दुनियेकडे वळण्याचा निर्णय तिने कसा घेतला हा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर तिने ती लहानपणी आई-वडिलांसह चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहामध्ये जात असे. पण चित्रपट गृहामध्ये चित्रपट पाहण्याचा आनंद तिला जास्त वेळ अनुभवता आला नाही कारण वर्षातून दोनच चित्रपट पाहण्यासाठी तिचे वडिल तिला घेऊन जात असत. दरम्यान हे चित्रपट पाहिल्यानंतर दीपिकाने चित्रपटसृष्टीतमध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला होता. पहिले तिने मॉडलिंग करण्याचे ठरवले आणि त्यानंतर अभिनयाच्या दुनियेत पदार्पण करण्याचा निर्णय घेतला होता असा खुलासा दीपिकाने केला आहे.

दरम्यान दीपिकाला स्टारडमबद्दलही काही प्रश्न विचारण्यात आले होते. त्यावर तिने ‘अभिनेत्री झाल्यानंतरही माझ्या स्वभावात काही बदल झाला नाही असे जेव्हा लोकं म्हणातात तेव्हा मला फार आनंद होतो. मला स्टारडमपेक्षा ही गोष्ट ऐकल्यावर जास्त आनंद होतो’ असा खुलासा केला आहे.

सध्या दीपिका तिचा आगामी चित्रपट ’83’च्या चित्रिकरणामध्ये व्यग्र आहे. या चित्रपटात दीपिका अभिनेता रणवीर सिंगच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे. त्या दोघांचा लग्नानंतरचा हा पहिला एकत्र चित्रपट आहे. त्यानंतर दीपिका २०२०मध्ये प्रदर्शित होणाऱ्या ‘छपाक’ चित्रपटात देखील दिसणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 22, 2019 11:37 am

Web Title: deepika padukone speaks about how she choose to work in film industry avb 95
Next Stories
1 इंदिरा गांधी यांच्यावर वेब सीरिज, ‘ही’ अभिनेत्री साकारणार मुख्य भूमिका
2 स्पायडरमॅनची अ‍ॅव्हेंजर्समधून एक्झीट, जाणून घ्या कारण…
3 असा रंगला नुसरत जहॉं यांचा संगीत सोहळा, पाहा फोटो
Just Now!
X