News Flash

Photo : ऋषी कपूर- नीतू कपूर यांच्या भेटीला दीपिका

ब्रेकअपनंतरही दीपिकाने रणबीर आणि त्याच्या कुटुंबीयांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवले आहेत.

नीतू कपूर, ऋषी कपूर, दीपिका पदुकोण

ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर गेल्या सात-आठ महिन्यांपासून न्यूयॉर्कमध्ये कॅन्सरवरील उपचारासाठी आहेत. यादरम्यान बऱ्याच कलाकारांनी त्यांची तिथे भेट घेतली. नुकतीच रणबीर कपूरची एक्स गर्लफ्रेंड अभिनेत्री दीपिका पदुकोणने ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांची भेट घेतली. या भेटीनंतर नीतू यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिघांचा फोटो पोस्ट केला आहे.

‘दीपिकासोबत घालवलेली संध्याकाळ अत्यंत मजेशीर होती,’ या कॅप्शनसह नीतू कपूर यांनी फोटो पोस्ट केला. दीपिकाने ‘मेट गाला २०१९’ या सोहळ्याला हजेरी लावली होती. हा सोहळा न्यूयॉर्कमध्येच पार पडला होता. त्यानंतर तिने या दोघांची भेट घेतली. ब्रेकअपनंतरही दीपिकाने रणबीर आणि त्याच्या कुटुंबीयांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवले आहेत. ऋषी कपूर यांची तिने घेतलेली भेट हे त्याचेच एक उदाहरण आहे. काही दिवसांपूर्वीच ऋषी कपूर यांचे मित्र आणि दिग्दर्शक राहुल रवैल यांनी ऋषी कपूर कॅन्सरमुक्त झाल्याची माहिती सोशल मीडियावर दिली होती. त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत असल्याचं रणबीरनेही सांगितलं.

‘गेले एक वर्ष बाबांसाठी खूप कठीण होतं. शेवटच्या क्षणापर्यंत चित्रपटांमध्ये काम करण्याची त्यांची तीव्र इच्छा आहे. आजारी असतानाही ते भविष्यात भूमिका मिळतील का याची चिंता व्यक्त करत असे,’ असं रणबीरने एका मुलाखतीत सांगितलं होतं.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 12, 2019 5:28 pm

Web Title: deepika padukone spends an evening with rishi kapoor and neetu kapoor
Next Stories
1 Student Of The Year 2 : ‘ये दुख खत्म क्यूँ नहीं होता?’ म्हणत नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
2 ‘बाजीगर’च्या शूटिंगदरम्यान शिल्पा शेट्टीला या कारणामुळे आला होता काजोलचा राग
3 ‘जेव्हा परदेशी मीडिया विकत घेता येत नाही’; रिचा चड्ढाचा मोदींना टोला
Just Now!
X