News Flash

अखेर दीपिकाने विनला हिंदी शिकवले

विन डिझेलने दीपिकाबरोबरचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे

हॉलिवूडमधून दमदार पदार्पण करण्यासाठी अभिनेत्री दीपिका पदुकोण आता पूर्णपणे सज्ज झाली आहे. बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपटांमध्ये उल्लेखनीय आणि प्रभावी भूमिका साकारत आपली छाप उमटवणारी दीपिका अलीकडे हॉलिवूडवारी करण्यात फारच व्यस्त असल्याचे पाहायला मिळते. ‘ट्रिपल एक्स- द रिटर्न ऑफ झेंडर केज’ या तिच्या हॉलिवूडपटामुळे सध्या ती प्रचंड चर्चेत आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून हॉलीवूडमध्ये आपले नशीब आजमावू पाहणारी दीपिका सोशल मीडियावरही बरीच सक्रिय असून तिच्या चित्रपटांबद्दलच्या प्रत्येक घटनेच्या पोस्ट करत असतेच.
चित्रपटाच्या फर्स्ट लुकपासून ते त्याच्या लोगोपर्यंत दीपिकाने सोशल मीडियाच्या माध्यमातून केलेल्या विविध पोस्ट्समुळे सिनेरसिकांमध्ये या चित्रपटाबाबत फारच उत्सुकता लागून राहिली आहे. याच उत्सुकतेत भर घालत विन डिझेलने दीपिकाबरोबरचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यात तो दीपिकाकडून हिंदीचे धडे घेताना दिसत आहे.
हॉलिवूड स्टार विन डिझेज याने फेसबुकवर लाईव्ह होत याची माहिती दिली. दीपिका माझी चांगली मैत्रिण आहे, अशी त्याने सुरुवात केली. ‘ट्रिपल एक्स- द रिटर्न ऑफ झेंडर केज’ प्रदर्शित झाल्यानंतर दीपिका कोण आहे, हे संपूर्ण जगाला कळेल, अशा शब्दांत विनने दीपिकाची स्तूती केली. ही इतकी स्तूती ऐकून दीपिका विनवर भाळणार नाही तर नवलच.
‘ट्रिपल एक्स- द रिटर्न ऑफ झेंडर केज’ या चित्रपटातून सेरेना उनगेरची भूमिका साकारणाऱ्या दीपिका या चित्रपटात एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘ट्रिपल एक्स’ चित्रपट मालिकेतील तिसरा आणि बहुप्रतिक्षित असा हा ‘ट्रिपल एक्स- द रिटर्न ऑफ झेंडर केज’ पुढील वर्षी २० जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 8, 2016 9:05 pm

Web Title: deepika padukone teaches hollywood star vin diesel how to speak hindi
Next Stories
1 खिलाडी कुमार असा साजरा करणार त्याचा बर्थडे
2 आशुतोष गोवारीकर यांनी माफी मागावी, पाकिस्तानी मंत्र्यांची मागणी
3 आशाताईंना वाढदिवशी राधिका देणार खास ‘गिफ्ट’
Just Now!
X